ETV Bharat / state

चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या मोदी कुटुंबीयांना भाजप कार्यकर्त्यांची मारहाण - चित्रपट

मोदी कुटुंबीय पार्किंगमध्ये आले असताना त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरले आणि स्वप्नील मोदी आणि त्यांचे सासरे अनिल जयस्वाल यांना मारहाण केली. यावेळी महापालिकेचे एक जबाबदार पदाधिकारी तिथे होते. त्यांनीही मारहाण केली.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : May 18, 2019, 12:00 AM IST

चंद्रपूर - मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या मोदी कुटुंबीयांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तसेच राजकीय वरदहस्ताचा उपयोग करून उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप पायल मोदी यांनी पत्रकार परिषदेत केला.

बुधवारी रात्री मुंबई येथील उद्योजक स्वप्नील मोदी हे पत्नी पायल मोदी, सासू आणि सासऱ्यांसह शहरातील मिराज मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी गेले होते. त्यांची सीट बरोबर नसल्याने बाजूच्या रिकाम्या सीटवर बसण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ते बसले असताना काही वेळानंतर तिथे अमेय बोनगीरवार आपल्या कुटुंबासह आले. ही सीट आपली असून ती खाली करा, असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी कर्मचाऱ्यांनीच ही सीट आम्हाला दिली आहे. तुम्ही दुसऱ्या सीटवर बसा, असे सांगितले. यावरून दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी बोनगीरवार यांनी आपण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जवळचे नातेवाईक असून तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी दिली.

यादरम्यान तिथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहचले. मोदी कुटुंबीय पार्किंगमध्ये आले असताना त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरले आणि स्वप्नील मोदी आणि त्यांचे सासरे अनिल जयस्वाल यांना मारहाण केली. यावेळी महापालिकेचे एक जबाबदार पदाधिकारी तिथे होते. त्यांनीही मारहाण केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

स्वप्नील मोदी, त्यांच्या पत्नी आणि सासू-सासऱ्यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर भा.द.वि कलम ३५४, ३२३, ३२४, ४२७ आणि ५०६ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करून स्वप्नील मोदी आणि त्यांचे सासरे अनिल जयस्वाल यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांच्या पत्नी पायल मोदी यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी पायलचे काका आणि राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वाल हे देखील उपस्थित होते.

(video - mojo वरून mh_chd_17_may_press_conference_01_7204762_av पाठविला आहे.)

 चंद्रपुर : मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या मोदी कुटुंबियांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि राजकीय वरदहस्ताचा उपयोग करून उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप पायल मोदी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

काल रात्री मुंबई येथील उद्योजक स्वप्नील मोदी हे आपली पत्नी पायल मोदी आणि सासू, सासऱ्यांसह शहरातील मिराज मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपट बघण्यासाठी गेले होते. त्यांची सीट बरोबर नसल्याने बाजूच्या रिकाम्या सीटवर बसण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ते बसले असताना काही वेळानंतर तिथे अमेय बोनगीरवार आपल्या कुटुंबासह आले. ही सीट आपली असून ती खाली करा असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी कर्मचाऱ्यांनीच ही सीट आम्हाला दिली असून तुम्ही दुसऱ्या सीट वर बसा असे मोदी म्हणाले. यावरून दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी बोनगीरवार यांनी आपण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जवळचे नातेवाईक असून तुम्हाला बघून घेईन असे म्हणाले. या दरम्यान तिथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोचले. मोदी कुटुंबीय पार्किंग मध्ये आले असताना त्यांना व्हजप कार्यकर्त्यांनी घेरले आणि स्वप्नील मोदी आणि त्यांचे सासरे अनिल जयस्वाल यांना मारहाण केली. यावेळी महापालिकेचे एक जबाबदार पदाधिकारी तिथे होते. त्यांनीही मारहाण केली, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की पोलीसाच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वप्नील मोदी, त्यांच्या पत्नी आणि सासू-सासऱ्यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर भादवी कलम 354, 323, 324, 427 आणि 506 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करून स्वप्नील मोदी आणि त्यांचे सासरे अनिल जयस्वाल यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांच्या पत्नी पायल मोदी यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही असा आरोप त्यानी केला. यावेळी पायलचे काका आणि राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वाल हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील गंभीर आरोप यावेळी केले. 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.