ETV Bharat / state

माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्र शोकाकुल, अनेक नेत्यांनी व्यक्त केले दुःख

राज्याचे माजी पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या या निधनावर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Chandrapur
Chandrapur
author img

By

Published : Apr 25, 2021, 8:43 PM IST

चंद्रपूर : राज्याचे माजी पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे आकस्मिक निधन राजकीय क्षेत्रासाठी धक्कादायक असून मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. त्यांच्या निधनावर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला : विजय वडेट्टीवार

अजात शत्रु, अत्यंत लोकप्रिय जीवन जगणारे, सुस्वभावी, गेल्या अनेक दशकापासून माझे सहकारी असलेले, जिव्हाळ्याचे मित्र संजय देवतळे यांच्या निधनाची वार्ता ऐकताच अतीव दु:ख झाले. ही न भरुन निघणारी हानी आहे, अशी शोकभावना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वक्त केली. संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असून या बातमीवर विश्वासच बसत नाही, असेही त्यांनी म्हटले.

माजी मंत्री दादासाहेब देवतळे नंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीपणे पुढे नेली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे 20 वर्षे आमदार होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी दिर्घकाळ जनतेची सेवा केली. राज्यात काँगेस पक्षाचे सरकार असताना ते राज्याचे सांस्कृतीक व पर्यावरण मंत्री, चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून यशस्वीपणे काम पाहिले. अतिशय शांत, लोकप्रिय नेता व अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. चंद्रपूर जिल्ह्याने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे. त्यांचे असे जाने न भरुन निघणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो व त्यांच्या परिवाराला हा मोठा आघात सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

संजय देवतळे यांच्या निधनाने वरोरा- भद्रावती मतदार संघाची हानी : खासदार बाळू धानोरकर

ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वारसा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थपणे सांभाळणारे माजी मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे, अशा शोकभावना चंद्रपूर- वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.

संजय देवतळे यांनी वरोरा-भद्रावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्याच मतदार संघात सेवा करण्याची संधी मलाही आमदारकीच्या रूपात मिळाली. आज त्या विकासाचा रथ आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, अतिशय शांत, संयमी लोकप्रतिनिधी कायमचा हरवल्याने वरोरा-भद्रावती मतदारसंघाची हानी झाली आहे. मी २००९ मध्ये पहिल्यांदा त्यांच्याच विरोधात विधानसभा लढली. मी तेव्हा हरलो. मात्र, ते जिंकल्याचा तितकाच आनंद होता. कारण ते मंत्री होऊ शकले आणि वरोरा- भद्रावती मतदार संघाचे नावलौकिक केले. हा मनातील आनंद मी त्यांना भ्रमणध्वनीवर विजयी शुभेच्छा देताना बोलून दाखविला होता. पक्षीय मतभेद विसरून कामे करणारा नेता आपल्याला सोडून गेल्याचे दुःख आहे, असे धानोरकर म्हणाले.

शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : सुधीर मुनगंटीवार

राज्‍याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. संजय देवतळे यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असून या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. विधानसभा सदस्‍य म्‍हणून त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न मांडणारा अभ्‍यासू लोकप्रतिनिधी म्‍हणून त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्‍हणून त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटुंबियांना या दु: खातून सावरण्‍याचे बळ देवो, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, जिव्हाळ्याचा मित्रा गमावला- हंसराज अहीर

राजकारण व समाजकारणात अनेक नावे असतात. मात्र राजकारणाच्या पलीकडे जनमानसात आपली ओळख निर्माण करून जगणारे नेते हे क्वचितच आढळतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे स्व. संजय देवतळे हे आहेत. त्यांच्यावर कोरोनाने घातलेल्या आघातामुळे चंद्रपूर जिल्ह्याने एका सच्चा नेत्याला गमावले आहे. त्यांचे असे जाणे भाजप व जिल्ह्यातील नागरिकांची न भरून निघणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व त्यांच्या परिवाराला हा मोठा आघात सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

शांत स्वभावी नेत्यास समाज मुकला - आमदार किशोर जोरगेवार

शांत स्वभावाने साऱ्यांनाच आपलेसे वाटणाऱ्य नेत्यास समाज मुकला असल्याची शोकसंवदेना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. सलग चार वेळा वरोरा - भद्रावती विधानसभेचे नेतृत्व त्यांनी केले. या काळात त्यांनी आपल्या शांत स्वभावाने कार्यकर्ते जोडत संघटन बळकट केले. त्यांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर पक्षांचा झेंडा फडकविला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी उत्तम रित्या पेलली. आज त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो हिच प्रार्थना करतो, अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

संजय देवतळे म्हणजे दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व : आमदार प्रतिभा धानोरकर

शांत, सुस्वभावी, संयमी राजकारणी, साधे सरळ व्यक्तिमत्व, माजी पालकमंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार संजय देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे हे वरोरा विधानसभा क्षेत्रासाठीच नाही, तर राज्यासाठी एक अपिरीमित हानी आहे. राजकारणात अशी सरळमार्गी व साधी माणसं आता फार कमी राहीली आहे. मी जेव्हा आमदार म्हणून निवडू आलेे, तेव्हा मला कॉल आला व वरोरा विधानसभेच्या प्रथम महिला आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या. तसेच या क्षेत्राच्या लवकरच प्रथम महिला मंत्री व्हाव्या, असा आशीर्वादही दिला. ते शब्द आजही मला भावूक करतात, असेे प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.