चंद्रपूर - कोरोना काळामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यात महावितरणने भरमसाठ वीजबिले आकारली. राज्य शासनाने आधी यात सूट देण्याचे आश्वासन दिले मात्र नंतर त्यांनी घुमजाव केले. त्यामुळं विरोधी पक्ष भाजपने याचा निषेध करण्यासाठी आज 'ताला ठोको' आंदोलन केलं.
त्यामुळे इतके अवाढव्य बिल भरायचे कसे, हा सर्वात मोठा प्रश्न ग्राहकांच्या समोर उपस्थित झाला आहे. अशातच महावितरण कंपनीने कठोर भूमिका घेत अशा ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे लोकांत असंतोष निर्माण झालाय. भाजपनं याच मुद्द्यांवर हे आंदोलन करीत सरकारने सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. हे आंदोलन जिल्ह्यातील सर्व ठिकाणी करण्यात आलं.