चंद्रपूर - भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिमूर कान्पा मार्गावरील किटाळी येथे दुपारी साडेतीनच्या दरम्यान दोन दुचाकीचा अपघात झाला आहे. यात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रामप्रताप सीतारामसिंह पवार (वय ५४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
विशाल गोपीचंद टेम्भुरकर (वय३२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचाराकरता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. मृत रामप्रसाद हे दाबका हेटी येथे राहून आपल्या जावयाची शेती करत होते. शंकरपूर येथून सामान खरेदी करुन ते आपल्या (एम एच ३५ यु ३९९४) दुचाकीने दाबका हेटी येथे जात होते. तर विशाल आपल्या दुचाकीने चिमूरवरुन शंकरपूर येथे येत होते. चिमूर कान्पा मार्गावरील किटाळी जवळ दोघांच्याही दुचाकी समोरासमोर येऊन जबर टक्कर झाली. यात रामप्रसाद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी शंकरपूर पोलीस चौकीचे उप पोलीस निरीक्षक जाबळे यांच्या नेतृत्वात अधिक तपास सुरू आहे .