चंद्रपूर - विदर्भातील लोकसभेच्या 7 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या वेळेस चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले होते. यावेळी हे मतदान मागच्या वेळीएवढे हाईल का? याबाबत साशंकताच होती. मात्र, चांद्रपूरकरांनी कुठलीही तमा न बाळगता लोकशाहीचे कर्तव्य आवर्जून बजावले. विशेष म्हणजे कोणतीही अनुचित घटना न घडता हे मतदान शांततेत पार पडले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ६३.२९ टक्के इतके मतदान झाले होते. यावेळी हे मतदान ६३ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत सर्व उपविभागातून आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरु आहे.उद्या यासंदर्भात निवडणूक आयोगामार्फत अधिकृत आकडेवारी जाहीर होणार आहे.
LIVE -
- चंद्रपुरात ६३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज
- चंद्रपुरात सांयकाळी पाचपर्यंत ५५.९७ टक्के मतदान
- दुपारी ३ वाजता - चंद्रपुरात ४२.६८ टक्के मतदान
- दुपारी ३ वाजेपर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी-
- राजुरा - ४४.६८
- चंद्रपुर - ३७.०४
- बल्लारपूर - ४४.६९
- वरोरा - ४३.००
- वणी - ४४.१९
- आर्णी - ४४.०४
- दुपारी १ वाजता - चंद्रपुरात ३० टक्के मतदान
- दुपारी १२.०० वाजता - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदी सिटी शाळेत मतदानाचा हक्क बजावला
- सकाळी ११.०० वाजता - चंद्रपूर मतदारसंघात १९ टक्के मतदान
- सकाळी ९.०० वाजता - चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मतदानाला थंड प्रतिसाद, अवघे ६.७५ टक्के मतदान
- चंद्रपूर लोकसभेत सलग ४ वेळा निवडून आलेले खासदार हंसराज अहिर यांनी हिंदी सिटी शाळेतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
- ९ वाजून ५० मिनिटे - भाजप उमदेवार हंसराज अहिर यांनी मतदानापूर्वी घेतले माता महाकालीचे दर्शन
- ८ वाजून २५ मिनिटे - काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांची वरोडा मतदान केंद्रावर पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क.
- ८ वाजून ११ मिनिटे - धाबा मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये दोनवेळा बिघाड, अर्धा तास मतदानाची प्रकिया खोळंबली. नवीन मशीन बसवल्यानंतर मतदानाला सुरुवात.
- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात जवळपास १३ लाख मतदार आहेत. यावर्षी ६० ते ७० टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.