ETV Bharat / state

बार्टीचे युक्ती प्रशिक्षण केंद्र हलविणार? ईटीव्हीमुळे भ्रष्ट कारभार उघड होण्याची भीती - Training Centre

बार्टीच्या (Babasaheb Ambedkar Research and Training Institute) युक्ती प्रशिक्षण केंद्रात (Training Centre) सुरू असणारा भ्रष्ट कारभार (corrupt administration) चौकशी लागली तर उघड होऊ नये यासाठी हे केंद्र हलविण्याचे काम सुरू झाले आहे. ईटीव्ही भारतने केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याच्या धसक्याने या हालचाली सुरू झाल्या आहेत. चौकशी झाल्यास मोठे घबाड उघड होण्याची दाट शक्यता आहे.

Barty training center will move
बार्टीचे युक्ती प्रशिक्षण केंद्र हलविणार?
author img

By

Published : Nov 3, 2022, 5:18 PM IST

चंद्रपूर: बार्टीच्या (Babasaheb Ambedkar Research and Training Institute) युक्ती प्रशिक्षण केंद्रात सुरू असणारा भ्रष्ट कारभार (corrupt administration) चौकशी लागली तर उघड होऊ नये यासाठी हे केंद्र हलविण्याचे काम सुरू झाले आहे. ईटीव्ही भारतने केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याच्या धसक्याने या हालचाली सुरू झाल्या आहेत. चौकशी झाल्यास मोठे घबाड उघड होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरू असलेला भ्रष्ट कारभार उघड होऊ नये आणि आणि केंद्राची मान्यता आपल्या हातून जाऊ नये यासाठी यासाठी चोर खिडकी येथील प्रशिक्षण केंद्रच इतर ठिकाणी हलविण्याचे काम सुरू झाले आहे. ते अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे. मागील आठ-दहा वर्षांपासून हे केंद्र एक खासगी शाळेच्या वर सुरू होते. विशेष म्हणजे प्रशिक्षण वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि इतर कुणाला काहीही माहिती न होऊ देता अत्यंत गुप्त पद्धतीने हे केंद्र हलविण्यात येत आहे.

प्रशिक्षणार्थी सांशक आहे: बार्टी (Babasaheb Ambedkar Research and Training Institute) अंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निशुल्क स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्याचे कंत्राट चंद्रपुरात युक्ती मल्टीपर्पज सोसायटीला मिळाले आहे. ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब विद्यार्थी येथे स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. चंद्रपुरातील चोरखिडकी परिसरात कवाडे यांच्या मालकीच्या इमारतीत हे केंद्र आहे. खाली कॉन्व्हेंट आणि वर बार्टी. या केंद्राला प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधीचा निधी येतो. परंतु या निधीचा योग्य वापर होतो, याबाबत येथील प्रशिक्षणार्थी सांशक आहे.

विद्यार्थ्यांना भेदभावपूर्ण वागणूक मिळते: युक्ती सोसायटीच्या संचालिका अनुपमा बुजाडे हे केंद्र चालवितात. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना भेदभावपूर्ण वागणूक मिळते, असाही आरोप आहे. बार्टीद्वारा देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतात, त्यांचे मानधन रोखतात, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशी विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहे. आपल्याच मर्जीतील माणसे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून ठेवण्यात आले आहे. त्यांना मिळणारा मानधनातील अर्धा वाटा इतरत्र वळता केला जातो. झालेल्या न झालेल्या कामांची वाढीव देयक दिली जातात. कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यार्थ्यांना पैसे गोळा केले जातात असे येथे काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु तक्रार करण्यास कुणी धजावत नाही. त्याचाच फायदा या संस्थेकडून घेतला जात आहे. मात्र येथील अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आपली परिस्थिती ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितली.

केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू: ईटीव्ही भारतने येथे चालणारा गैरप्रकार प्रकाशात आणला. बुजाडे यांनी जाणीवपूर्वक मानधन रोखल्याचा आरोप केल्यानंतर ईटीव्ही भारतने याची पडताळणी केली असता बायोमेट्रिक मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेरे हे नावापुरते सुरू असल्याचे समोर आले. तसेच इतरही अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे या केंद्राची चौकशी आता कधीही होऊ शकते. याचा धसका घेत ऐन प्रशिक्षण वर्ग सुरू असताना गुपचूपपणे हे केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यावरून या केंद्रात आत्तापर्यंत सुरू असलेला गौडबंगाल लक्षात येतो.

केंद्राच्या इमारतीबाबत नियम: या केंद्राच नियमानुसार केंद्राच्या इमारतीची जागा ही कमीत कमी अडीच हजार चौरस फूट हवी. प्रति हॉल 500 चौरस फूट हवी. किमान 260 लिटर क्षमता असलेला फिल्टरसह आरोचे पाणी, इन्व्हर्टर, आधार संलग्न बायोमेट्रिक मशीन, किमान 20 बैठक व्यवस्था असलेली संगणक लॅब, वायफाय, संपूर्ण प्रशिक्षण केंद्राचा परिसर (वर्गखोल्यासह) सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा असल्याचा पुरावा, मासिके तसेच वृत्तपत्रे घेत असल्याचा पुरावा या सर्व मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. यातील अनेक सुविधा नसताना युक्तीचे केंद्र सुरू होते आता पुढे स्थानांतरण होणाऱ्या या केंद्राच्या इमारतीत ह्या सर्व सुविधा असणार का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.