ETV Bharat / state

'त्या' फेसबुक पोस्टप्रकरणी बलराज धोटेंना अटक, शहर पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा - हाय व्होल्टेज ड्रामा

20 ऑगस्टला बळीराज धोटे यांनी भगत सिंग यांच्यावर चालवलेल्या न्यायालयीन खटल्याबाबत फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यावर भाजपच्या आयटी सेलकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

बलराज धोटेंना अटक
author img

By

Published : Aug 25, 2019, 1:27 PM IST

चंद्रपूर - फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी 'सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट' संघटनेचे अध्यक्ष बळीराज धोटे यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. धोटे यांना शहर पोलीस ठाण्यात आणले असता, येथे जमा झालेल्या नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा हा प्रकार भाजपकडून केला जात आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी नोंदवल्या.

बलराज धोटेंना अटक

याबाबत अधिक माहिती अशी, की 20 ऑगस्टला बळीराज धोटे यांनी भगत सिंग यांच्यावर चालवलेल्या न्यायालयीन खटल्याबाबत फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यावर भाजपच्या आयटी सेलकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर पोलिसांनी बळीराज धोटे यांना घरातून ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. याबाबतचीही पोस्ट धोटेंनी फेसबुकवर टाकली.

ही घटना सर्वत्र पसरल्यानंतर अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. सकाळी धोटे यांची वैद्यकीय चाचणी करून ठाण्यात आणले असता, चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा घडला. पोलीस ज्या प्रकारे आपल्याला वागणूक देत आहेत, त्यावर धोटेंनी तीव्र आक्षेप घेतला. आपण काही अतिरेकी नाही किंवा पळून जाणारे नाही, तरी देखील आपल्यावर बळजबरी कशासाठी केली जात आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला बोलण्यापासून रोखले जात आहे, असेही धोटे यावेळी म्हणाले. यावेळी धोटे समर्थक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

Intro:चंद्रपूर : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट संघटनेचे अध्यक्ष बळीराज धोटे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. धोटे यांना शहर पोलीस ठाण्यात आणले असता येथे जमा झालेल्या नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा हा प्रकार भाजपकडून केला जात आहे आशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी नोंदवल्या.

Body:20 ऑगस्टला बळीराज धोटे यांनी भगत सिंग यांच्यावर चालविलेल्या न्यायालयीन खटल्याबाबत एक पोस्ट टाकली होती. यावर भाजपच्या आयटी सेल कडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आज चार वाजता पोलिसांनी बळीराज धोटे यांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना सकाळी सहा वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आली. याबाबतची पोस्ट सुद्धा त्यांनी फेसबुकवर टाकली होती. सकाळी ही घटना सर्वत्र पसरली आणि अनेक नागरिकांनी पोलिस स्टेशन समोर गर्दी केली. सकाळी त्यांची वैद्यकीय चाचणी करून ठाण्यात आणले असता येथे चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा घडला. पोलीस ज्या प्रकारे आपल्याला वागणूक देत आहेत यावर धोटे यांनी तिव्र आक्षेप घेतला. आपण काही अतिरेकी नाही किंवा पळून जाणारे नाही तरी देखील आपल्यावर बळजबरी कशासाठी केली जात आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला बोलण्यापासून रोखले जात आहे असेही ते म्हणाले. यावेळी धोटे समर्थक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.