ETV Bharat / state

चंद्रपुरात कारसह साडेतीन लाखांचा दारूसाठा जप्त - Chandrapur latest news

कल्लेसिंग संध्विंदरसिंग सल्लुजा (वय 25 मु. वडसा ता. वडसा जि. गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 3 लाख 60 हजार किमतीचा दारूसाठा तसेच एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी अंदाजे किंमत 5 लाख 50 हजार रुपये असा एकूण माल 9 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रपुरात कारसह साडेतीन लाखांचा दारूसाठा जप्त
author img

By

Published : Nov 10, 2019, 10:36 PM IST

चंद्रपूर - बेकायदा दारू विक्रीसाठी आणताना स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई वडसा-ब्रम्हपुरी ते चांदगाव मार्गावर पोलिसांनी केली.

हेही वाचा - 'राम भी यहीं, रहीम भी यहीं', चंद्रपूरमध्ये ईदच्या रॅलीत घडले एकतेचे दर्शन

कल्लेसिंग संध्विंदरसिंग सल्लुजा (वय 25 मु. वडसा ता. वडसा जि. गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 3 लाख 60 हजार किमतीचा दारूसाठा तसेच एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी अंदाजे किंमत 5 लाख 50 हजार रुपये असा एकूण माल 9 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून वनरक्षकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

याबाबत अधिक माहिती अशी, की वडसा-ब्रम्हपुरी ते चांदगाव मार्गाने दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चांदगाव रस्त्यावर नहराच्या पुलावर नाकाबंदी केली. त्यादरम्यान एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीच्या कारमधील (एमएच- 01- एसी- 9992) एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने फरार झाला. तेव्हा पोलिसांनी गाडी चालक आरोपी कल्लेसिंग सल्लुजा याला अटक केली. तसेच गाडीमधून प्रत्येकी 100 नग असलेली 36 पेटी दारु जप्त करण्यात आली आहे.

ब्रम्हपुरी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी डिबी पथक उप पोलीस निरीक्षक अख्तर सय्यद, कुष्णा रॉय, संदेश देवगडे, अमोल गिरडकर, नितीन भगत, विजय मैंद, स्विखील उराडे, निलेश माहुर्ले, सैनिक अमोल ठेंगरी यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक अख्तर सय्यद करत आहेत.

Intro:दारूबंदी जिल्हयात अवैध दारूचा पुर
9 लाख 10 हजार रुपयांची दारू जप्त*
ब्रम्हपुरी पोलीसांची कार्यवाही
चिमूर MHCHD10019
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीला चार वर्ष पुर्ण झाले . मात्र जिल्ह्यातील फक्त दारूची सरकार मान्य दुकाने बंद झालीत . तर अवैध दारू विक्रीचे गुत्ते प्रत्येक चौक व गल्लीत वाढली . यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न पोलीस विभागा कडून होत असला तरी मोठया प्रमाणात दारू विक्री सुरूच आहे . दारूबंदी जिल्ह्यात अवैध दारूचा पुरच आलाकी काय असा प्रश्न सामान्यांना पडत आहे .
जिल्हयातील ब्रम्हपूरी तालुक्यातही अनेक दारूतस्कर पोलीसांना चकमा देवुन अवैध रित्या दारूची तस्करी करतात . ब्रम्हपुरी परिसरात अनेक दिवसांपासून ब्रम्हपुरी पोलीसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. बाजुच्या जिल्ह्यामधुन होत आहे अवैध दारूची तस्करी ब्रम्हपुरी पोलीसांचे खबरी सक्रिय होवुन कामगिरी बजवित आहे. काल दिनांक 9/11 /19 ला ब्रम्हपुरी पोलीस डीबी पथक यांना मुकखबरी यांच्या कडुन वडसा - ब्रम्हपुरी ते चांदगाव रोडने एका सिल्वर रंगाच्या मारुती सुझुकी ने दारुची अवैधरीत्या वाहतूक होणार आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली व त्या माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी पोलीसांनी सापळा रचून चांदगावच्या रोडवरील नहराच्या पुलिया वर मध्य रात्रि 12 ते 1 वाजताच्या दरम्यान नाकाबंदी केली. व त्या दरम्यान एक सिल्वर रंगाची मारुति सुजुकी कंपनीची कार SX4 क्र. MH - 01 AC 9992 या गाडीला थांबवली असता गाडीतील एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने फरार झाला. ब्रम्हपुरी पोलीसांनी पाठलाग पण यश आले नाही. व गाडी चालक आरोपी कल्लेसिंग संध्विंदरसिंग सल्लुजा वय 25 मु. वडसा ता. वडसा जि. गडचिरोली याला अटक करण्यात आली आहे. गाडीची चौकशी केली असता गाडीमधून प्रत्येकी 100 नग असलेले खरड्यांचे 36 पेटी दारु असा एकुण माल 3,60,000 रुपये तसेच एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची कार अंदाजे किंमत 5,50,000 रुपये असा एकूण माल 9 लाख 10 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दारूसाठा जप्त करण्यात आले. सदर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हा अवैध दारूसाठा गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव येथुन केली जात असल्याचे पुढे आले आहे. ब्रम्हपुरी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी डिबी पथक उप पोलिस निरीक्षक अख्तर सय्यद कुष्णा रॉय, संदेश देवगडे, अमोल गिरडकर, नितीन भगत, विजय मैंद, स्विखील उराडे, निलेश माहुर्ले, सैनिक अमोल ठेंगरी यांनी कार्रवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक अख्तर सय्यद करत आहेत.Body:मुद्देमालासह ब्रम्हपुरी पोलीस Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.