ETV Bharat / state

Administration on Chandrapur ZP : चंद्रपूर झेडपीचा कारभार आता प्रशासकाच्या हाती; पाच वर्षांचा काळ संपुष्टात - Administration on Chandrapur ZP

जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समित्यांतील सदस्यांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे तेथेही प्रशासकांची नियुक्ती करण्यात ( administration of ZP Chandrapur ) आली. रविवारी सायंकाळी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची वाहने जिल्हा परिषद प्रशासनाने ताब्यात घेतली. मात्र, बंगल्यांसाठी तीन महिन्यांची मुदत प्रशासनाने ( three months for the bungalows ) दिली आहे. या कालावधीनंतर पदाधिकाऱ्यांना बंगले खाली करावी लागणार आहेत.

जिल्हा परिषद चंद्रपूर
जिल्हा परिषद चंद्रपूर
author img

By

Published : Mar 21, 2022, 10:43 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा परिषदेचा ( five year term of Chandrapur Zilha Parishad )पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आता याचा सर्व कारभार प्रशासकाच्या हाती सोपविण्यात आला आहे. कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने ( Rural Development Department order ) काही दिवसांपूर्वीच अध्यादेश काढून प्रशासकाची नेमणूक करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यामुळे आज सोमवारपासून निवडणूक होईपर्यंत तरी झेडपीचा कारभार प्रशासकाच्या हाती राहणार आहे.

जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समित्यांतील सदस्यांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे तेथेही प्रशासकांची नियुक्ती करण्यात ( administration of ZP Chandrapur ) आली. रविवारी सायंकाळी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची वाहने जिल्हा परिषद प्रशासनाने ताब्यात घेतली. मात्र, बंगल्यांसाठी तीन महिन्यांची मुदत प्रशासनाने ( three months for the bungalows ) दिली आहे. या कालावधीनंतर पदाधिकाऱ्यांना बंगले खाली करावी लागणार आहेत.

हेही वाचा-MNS Shivjayanti : मनसेच्या शिवजयंतीत दिसलं हिंदू मुस्लिम ऐक्य, ढोल वाजवणारा सलमान चर्चेत

कोरोना काळात तीन जिल्हा परिषद सदस्यांचे निधन
२१ मार्च २०१७ रोजी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. निवडणुकीत ३३ सदस्य भाजपाचे, २० काँग्रेसचे तर तीन अपक्ष सदस्य विजयी झाले. अपक्ष सदस्यांनी भाजपला समर्थन दिले. बहुमत भाजपकडे आले. देवराव भोंगळे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. अडीच वर्षानंतर संध्या गुरुनुले यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. कोरोना काळात तीन जिल्हा परिषद सदस्यांचे निधन झाले. घुग्घुस नगरपालिकेच्या स्थापनेमुळे नितू चौधरी यांचे पद गेले.

हेही वाचा-Tribal Minister Inform : आश्रम शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरणार

दोन दिवसांपूर्वीच बजेटही सादर

जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने गट व गणांचा आराखडा तयार करून सादरही केला होता. या आराखड्यानुसार नवे ६२ सदस्य येणार होते. मात्र, राज्य शासनाने एक अध्यादेश काढला. त्यात निवडणूक प्रक्रियेच्या पुनर्रचनेचे अधिकार स्वत:कडे घेतले. आता शासनाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याने गट व गणांची संख्यासुद्धा कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत चांगलीच वर्दळ वाढली होती. दोन दिवसांपूर्वीच बजेटही सादर करण्यात आले.

हेही वाचा-Bicycle Trip For President Meet : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे एन्काऊंटरच करा; राष्ट्रपतींना भेटण्यासाठी एका बापाने सुरु केला सायकल प्रवास

पदाधिकाऱ्यांकडून कक्षाची मागणी
सदस्यांचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात आला आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे वेगवेगळे कक्ष आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांना कक्षात बसता येणार नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कक्षाची मागणी केली होती. ही मागणी सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मित्ताली सेठी यांनी मान्य केली होती. त्यामुळे एखादी कक्ष सत्ताधाऱ्यांना कामासाठी मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.