ETV Bharat / state

Aditya Thackeray Chandrapur : आदित्य ठाकरे यांचा चंद्रपूर दौरा रद्द.. रामाळा तलावाची करणार होते पाहणी - आदित्य ठाकरे यांचा चंद्रपूर दौरा रद्द

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ( Lata Mangeshkar Passed Away ) झाल्याने त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सूत्रांनी ( Aditya Thackeray Chandrapur Visit Canceled ) सांगितले.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 6, 2022, 8:56 PM IST

चंद्रपूर : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी चंद्रपूरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला ( Aditya Thackeray Chandrapur Visit Canceled ) आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे ( Lata Mangeshkar Passed Away ) त्यांचा हा दौरा हा रद्द झाला असल्याची माहिती आहे.

रामाळा तलावाचे अस्तित्व धोक्यात

आज लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनामुळे दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी चंद्रपूर शहराच्या दौऱ्यावर येणार होते. यावेळी ते शहरातील रामाळा तलावाची पाहणी करणार होते. रामाळा तलावामध्ये होणाऱ्या सांडपाणी प्रदूषणामूळे ह्या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले होते. याविरोधात इको प्रो संघटनेने आमरण उपोषण केले होते ज्याची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. तसेच या तलावाच्या स्वच्छतेचे आणि सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते त्यानुसार याची पाहणी करण्यासाठी ते चंद्रपुरात येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे.

असा होता दौरा

-सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटाने त्यांचे चंद्रपुरात आगमन होणार होते.
-5 वाजून 15 मिनिटांनी आदित्य ठाकरे रामाळा तलावाला भेट देऊन त्याची पाहणी करणार होते.
-5 वाजून 45 मिनिटाला ते गोंडकालीन किल्ल्याच्या स्वच्छतेची पाहणी करणार होते.
-6 वाजून 15 मिनिटांनी ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पर्यटनाच्या संदर्भात बैठक घेणार होते.
-यानंतर नागपुरकडे प्रयाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.