ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यातील 36 टक्के लोकांना नकळत होऊन गेला कोरोना; सिरो सर्वेक्षणाचा अहवाल

author img

By

Published : Dec 18, 2020, 8:46 AM IST

आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाट शक्यता आहे. अशावेळी प्रशासनाला सर्व सुविधांनी सज्ज राहण्यासाठी सिरो सर्वेक्षणाची गरज होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सिरो सर्वेक्षण केले.

Test
चाचणी

चंद्रपूर - जिल्ह्यातील 36.2 टक्के लोकांना अजाणतेपणी कोरोना होऊन गेला, अशी माहिती सिरो सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी नेमकी कोरोनाची काय स्थिती आहे, किती लोकांना याचा प्रादुर्भाव झाला याचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. कोरोना झाल्यावरही काही वेळा ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारची कुठलीही लक्षणे दिसून येत नाही. मात्र, शरीरात एक प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. या रोगप्रतिकारक शक्तीचीच चाचणी जिल्ह्यात सिरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आली होती. 17 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर यादरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेल्या 2 हजार 401 नामुन्यांपैकी 870 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी 36.2 टक्के इतकी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतून 726 नमुने घेण्यात आले ज्यात 270 नमुने हे पॉझिटिव्ह आढळले. ही आकडेवारी 37.2 टक्के इतकी आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात सरासरी 36 टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारक क्षमता तयार झाली आहे असा होतो.

चंद्रपूर जिल्ह्यातील 36 टक्के लोकांना नकळत कोरोना होऊन गेला
काय आहे सिरो सर्वेक्षण -

सिरो सर्वेक्षणाच्या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश कोरोना आजाराचा समाजातील किती लोकांपर्यंत प्रादुर्भाव झाला आहे, याचा अभ्यास करणे, आरोग्य सेवा बळकट करणे व त्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हा आहे. या सर्वेक्षणांमध्ये सामान्य लोकसंख्येमधील कमी जोखमीची तसेच जास्त जोखमीची लोकसंख्या, कंटेन्टमेंट झोनमधील लोकसंख्या व अतिजोखमीच्या क्षेत्रातील लोकसंख्या यांचा समावेश करण्यात आला. या सर्व्हेक्षणाअंतर्गत 21 गावे व 9 कंटेन्टमेट झोनची निवड करण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 400 नमुने घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यामध्ये 1 हजार 400 नमुने हे सामान्य लोकसंख्येमधून, 600 नमुने हे कंटेन्टमेंट झोनमधून व 400 नमुने हे अतिजोखिम क्षेत्रातील लोकसंख्येमधून घेण्यात आले. सर्वेक्षणामध्ये फ्रन्टलाइन वर्कर ज्यामध्ये शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता.

सिरो सर्वेक्षणाचे महत्त्व -

एका समूहाला नकळतपणे कोरोना होऊन गेला. अशावेळी जी सामूहिक रोगप्रतिकारक क्षमता तयार होते त्याला हर्ड इम्युनिटी असे म्हणतात. म्हणजेच पुन्हा एकदा कोरोनाच्या संपर्कात येऊनही अशा व्यक्तींना काहीही होत नाही. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाट शक्यता आहे. अशावेळी प्रशासनाला सर्व सुविधांनी सज्ज राहण्यासाठी सिरो सर्वेक्षणाची गरज होती. या माध्यमातून निघालेल्या आकडेवारीवरून पुढील उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

काय आहे 'आयजीजी' रोगप्रतिकारक क्षमता -

आयजीजी (IgG) म्हणजेच इम्युनो ग्लोब्युलीन्स. ज्यावेळी शरीरात कोरोनाचा शिरकाव होतो त्यावेळी ही रोगप्रतिकारक शक्ती कामाला लागते. कोरोनाच्या विषाणूसोबत ती दोन हात करत असते. शरीर पूर्णतः निरोगी ठेवण्याचे काम ही रोगप्रतिकारक शक्ती करीत असते. कोरोनाच्या कामात सक्रिय सहभाग घेणारे फ्रन्टलाइन वर्कर ज्यामध्ये शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचे काम अत्यंत जोखमीचे असते, अशावेळी त्यांना देखील कोरोना होतो. मात्र, आयजीजी रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्याने त्यांनाही हे कळून येत नाही कारण या दरम्यान कुठलेही कोरोनासदृश लक्षणे आढळून येत नाहीत. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झालेली असते.

सिरो सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल -

या सर्वेक्षणात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून रक्ताचे एकूण 2 हजार 401 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेतून 726 पैकी 270 तर ग्रामीण भागातून 1675 पैकी 600 नमुने पॉझिटिव्ह आढळले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारीमधून 50 पैकी 15, बल्लारपूर शहर 54 पैकी 21, बामणी 50 पैकी 29, कळमना 50 पैकी 16 नमुने पॉझिटिव्ह आलेत. चंद्रपुर तालुक्यातील नेरी येथे 50 पैकी 15, दुर्गापूर 50 पैकी 17, ऊर्जानगर 50 पैकी 14, मोरवा 50 पैकी 25, लखमापूर 55 पैकी 24, लोहारा 50 पैकी 9, चीचपल्ली 50 पैकी 15 पॉझिटिव्ह आले. याचप्रकारे मूल तालुका 75 पैकी 25, राजुरा तालुका 74 पैकी 35, भद्रावती तालुका 55 पैकी 10, पोंभुर्णा तालुका 25 पैकी 10, चिमूर तालुका 75 पैकी 21, कोरपना तालुका 103 पैकी 31, सिंदेवाही तालुका 51 पैकी 30, जिवती तालुका 105 पैकी 24, गोंडपीपरी तालुका 105 पैकी 28, ब्रम्हपुरी तालुका 105 पैकी 42, नागभीड 104 पैकी 59, वरोरा तालुका 163 पैकी 49, सावली तालुका 76 पैकी 36 इतके नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देण्यास टोलवाटोलवी -

याबाबत कॅमेऱ्यासमोर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास संबंधीत अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करण्यात आला. मात्र कोणीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. खर तर या सर्वेक्षणाच्या सर्व चाचण्या या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणाऱ्या विभागात झाल्या. मात्र, अधिष्ठाता डॉ. हुमने यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याबाबत आपण जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करावा अशी सूचना दिली. याबाबत शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क केला असता हा अहवाल आपल्या कार्यालयाला प्राप्त झाला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या माहितीने जनतेवर सकारात्मक परिणाम पडू शकतो अशी माहिती आणि त्यावरची प्रतिक्रिया देण्याबाबत तरी अधिकाऱ्यांनी संवेदनशील असणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.