ETV Bharat / state

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; आपचे धरणे आंदोलन - आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन चंद्रपूर

दिल्ली सरकारप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी आज(29 नोव्हेंबर) सावली तहसील कार्यालयात आम आदमी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी, पक्षाच्या सदस्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदनदेखील देण्यात आले.

savli
सावलीत आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Nov 29, 2019, 9:37 PM IST

चंद्रपूर - अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन देत असलेली ८ हजार रुपये हेक्टर भरपाई अपुरी आणि शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे, दिल्ली सरकारप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी आज (29 नोव्हेंबर) सावली तहसील कार्यालयात आम आदमी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी, पक्षाच्या सदस्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदनदेखील देण्यात आले.

सावलीत आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन

हेही वाचा - वंचितच्या नेतृत्त्वाखाली अकोल्यात शेतकरी आक्रोश मोर्चा; हेक्टरी 25 हजारांची मागणी

यावेळी बोलताना गोस्वामी म्हणाल्या, "जिल्ह्यात 1 लाख 85 हजार 30 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. आतापर्यंत 19 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 1051/- रुपये मंजूर होत आहेत. ही रक्कम देणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे" यावेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Intro:चंद्रपूर : राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची प्रचंड नुकसान झाले. शासनाने केवळ ८ हजार रूपये हेक्टर भरपाई जाहीर केली. ही मदत अपुरी आणि शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे. दिल्ली सरकारप्रमाणे शेतीची नुकसान भरपाई हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावी, या मागणीला घेऊन सावलीत आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन झाले. महाराष्ट्र राज्य समिती आम आदमी पार्टीच्या सदस्या अँड पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात तहसिलदाराना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकांची शेती केली जाते. यावर्षी धानपिकाचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, यंदा पावसाने सरासरी गाठली. परतीच्या पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वारंवार वाढतच आहे. जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपायीची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे . शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झालेला आहे. दिल्ली येथिल आम आदमी पार्टीची सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नूकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांचा असंतोष कमी करावा, अशी मागणी अँड. पारोमिता गोस्वामी यांनी केली.
यावेळी बोलताना एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले की जिल्ह्यात 1 लाख 85 हजार 30 शेतकऱ्यांची नुकसान झाल्याचे सरकारी आकडे आहेत आणि यांना आतापर्यंत 19 कोटी 45 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. याचा अर्थ प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 1051/- रुपये मंजूर होत आहे एवढी अत्यल्प रक्कम देणे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. त्यामुळे यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले. यावेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.