ETV Bharat / state

Leopard Attack : तीन वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने मारली झडप.. आईने काठीने बदडून लावले पळवून

चंद्रपुरात घरामध्ये जेवत असलेल्या तीन वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने हल्ला ( Leopard Attack On Child ) केला. शेजारीच असलेल्या आईने प्रसंगावधान राखत बिबट्याला काठीने बदडून काढत पळवून ( Mother Saved Child From Leopard ) लावले. या घटनेनंतर नागरिकांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दुर्गापुरात पुन्हा बिबट्याचा हल्ला; आईच्या सतर्कतेने तीन वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचले

author img

By

Published : May 11, 2022, 11:15 AM IST

चंद्रपूर : शहराला लागून असलेल्या दुर्गापूर येथे मानव- वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. काही दिवसांपूर्वीच बिबट्याने एका महिलेला ठार केले होते. ही घटना होते न होते तोच पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात आता चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक एक येथे तीन वर्षीय आरक्षा पोप्पूलवार ही चिमुकली आपल्या घरी जेवत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालून शिकार करण्याचा प्रयत्न ( Leopard Attack On Child ) केला. मात्र, प्रसंगावधानी आईने या बिबट्याला काठीने झोडपून काढले. त्यामुळे त्याने जंगलात धूम ठोकली आणि सुदैवाने या चिमुकलीचे प्राण ( Mother Saved Child From Leopard ) वाचले. मात्र तरीही ती या हल्ल्यात जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा दुर्गापूर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

बिबट्याची दहशत : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापुरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत सातपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आहे. वयोवृद्ध व्यक्ती, महिला, लहान मुले या सर्वांना बिबट्याने आपले शिकार केले आहे. या परिसरातील झाडेझुडपे साफ करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. मात्र वेकोलीने याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. आता हा प्रश्न सुटला असे वाटत असताना एका बिबट्याने हल्ला करीत महिलेला जागीच ठार केले. त्यामुळे पुन्हा बिबट्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

नागरिकांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

बिबट्याला ठार करा : आता पुन्हा एकदा बिबट्याने तीन वर्षीय चिमुकलीचा नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. जर तिची वेळेत आई धावून आली नसती तर तिचा जीवही गेला असता. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाची टीम येथे आली असता, त्यांना घेराव करण्यात आला. जोवर या बिबट्याला ठार केले जात नाही तोवर आपल्याला बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. तूर्तास ही स्थिती टळली असली तरी नागरिक आपल्या मागणीवर ठाम आहेत.

हेही वाचा : Leopard Hunts Dog : अंधारात बिबट्याने कुत्र्याची 'अशी' केली शिकार, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.