ETV Bharat / state

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास; अहिरांच्या नावाने सर्वाधिक रेकॉर्ड

भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांच्या नावावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक विक्रम आहेत. आजपर्यंत सर्वाधिक मतदान घेऊन निवडून येण्याचा मान हंसराज अहिर यांच्या नावावर आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अहिरांच्या नावाने सर्वाधिक रेकॉर्ड
author img

By

Published : Mar 31, 2019, 5:28 PM IST

Updated : Mar 31, 2019, 11:29 PM IST

चंद्रपूर - भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांच्या नावावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक विक्रम आहेत. आजपर्यंत सर्वाधिक मतदान घेऊन निवडून येण्याचा मान हंसराज अहिर यांच्या नावावर आहे. 2014 मध्ये ते तब्बल 5 लाख 8 हजार 49 मते घेऊन निवडून आले होते.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीचा इतिहास मोठा रंजक आहे. या लोकसभा क्षेत्रात एकूण ६ विधानसभा क्षेत्र येतात. 1951 पासून 2004 पर्यंत या लोकसभा क्षेत्रात गडचिरोली, सिरोंचा, राजुरा, चंद्रपूर, सावली, भद्रावती हे विधानसभा क्षेत्रांचा समावेश होते. 2009 पासून सावली, सिरोंचा, गडचिरोली विधानसभा क्षेत्र वगळण्यात आले आहेत. त्यानंतर राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी हे विधानसभा क्षेत्र तयार झाले आहे.

चंद्रपूर लोकसभेच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक टक्केवारी घेऊन निवडून येण्याचा मान काँग्रेसचे खासदार मुल्ला अब्दुलभाई ताहेर अली यांच्या नावावर आहे. देशातील पहिली निवडणूक 1951 साली झाली. यावेळी ताहेर अली हे एकून मतदानाच्या तब्बल 61.77 टक्के मते घेऊन निवडून आले होते. एकूण 2 लाख 30 हजार 336 मतांपैकी 1 लाख 42 हजार 277 ताहेर अली यांना मिळाली होती. आजवर सर्वाधिक मतदान घेऊन निवडून येण्याचा मान भाजपचे हंसराज अहिर यांच्या नावावर आहे. 2014 मध्ये ते तब्बल 5 लाख 8 हजार 49 मते घेऊन निवडून आलेत. सर्वाधिक कमी मते घेऊन निवडूनयेण्याची नामुष्की शेख अब्दुल राउफ सुलेमान 'पपामिया यांच्यावर ओढविली. 1996 मध्ये ते अपक्ष म्हणून लढले असता त्यांना केवळ 112 मते मिळाली होती.

सर्वात कमी मतांच्या फरकानेही हंसराज अहिर निवडून आले होते. 1999 मध्ये ते अवघ्या ३ हजार हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी अहिर यांनी नरेश पुगलियांचा पराभव केला होता. 2014 ला काँगेसचे उमेदवार संजय देवतळे यांना अहिरांनी 2 लाख 29 हजार मतांनी पराभूत केले. अहिर यांना 5 लाख 8 हजार 49 मते मिळाली होती तर देवतळे यांना 2 लाख 71 हजार 780 मते मिळाली. सर्वाधिक वेळा उमेदवारी मिळण्याचा विक्रमही अहिर यांच्याच नावावर आहे. त्यांना सलग 5 वेळा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी हा विक्रम माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या नावावर होता. सर्वाधिक वेळा निवडून येण्यात हंसराज अहिर आणि शांताराम पोटदुखे यांचे नाव पुढे आहे.

शांताराम पोटदुखे हे 1980, 1984, 1989 आणि 19891 ला कॉंग्रेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर अहिर हे 1996, 2004, 2009 आणि 2014 ला निवडून आले होते. 2019 ला निवडून अहिर निवडून आल्यास शांताराम पोटदुखे यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त उमेदवार हे 1996 च्या निवडणुकीत लढले. त्यावेळी तब्बल 24 उमेदवार रिंगणात होते.

Intro:चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीचा इतिहास मोठा रंजक आहे. या लोकसभा क्षेत्रात एकूण सहा विधानसभा क्षेत्र येतात. 1951 पासून 2004 पर्यंत या लोकसभा क्षेत्रात गडचिरोली, सिरोंचा, राजुरा, चंद्रपूर, सावली, भद्रावती हे विधानसभा क्षेत्र येत होते. 2009 पासून सावली, सिरोंचा, गडचिरोली विधानसभा क्षेत्र वगळण्यात आलेत. यानंतर राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी हे विधानसभा क्षेत्र तयार झाले. आजवरच्या इतिहासात सर्वाधिक विक्रम करण्याची नोंद ही भाजपचे हंसराज अहिर यांच्या नावे आहे.

Body:चंद्रपूर लोकसभेच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक टक्केवारी घेऊन निवडून येण्याचा मान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार मुल्ला अब्दुलभाई ताहेर अली यांच्या नावावर आहे. देशातील पहिली निवडणूक 1951 साली झाली. यावेळी ताहेर अली हे एकून मतदानाच्या तब्बल 61.77 टक्के मते घेऊन निवडून आलेत. एकूण 2 लाख 30 हजार 336 मतांपैकी 1 लाख 42 हजार 277 ताहेर अली यांना मिळाले. आजवर सर्वाधिक मतदान घेऊन निवडुन येण्याचा मान भाजपचे हंसराज अहिर यांच्या नावावर आहे. 2014 मध्ये ते तब्बल 5 लाख 8 हजार 49 मते घेऊन निवडून आलेत. सर्वाधिक कमी मते घेऊन निवडणूक येण्याची नामुष्की शेख अब्दुल राउफ सुलेमान 'पपामिया यांच्यावर ओढविली. 1996 मध्ये ते अपक्ष म्हणून लढले असता त्यांना केवळ 112 मते मिळाली.

Conclusion:सर्वात कमी मताच्या फरकाने हंसराज अहिर निवडून आलेत. 1999 मध्ये ते अवघ्या तीन हजार हजार मतांच्या फरकाने निवडून आलेत. यावेळी काँग्रेसचे उमेदवार नरेश पुगलिया यांना 3 लाख 28 हजार 489 मते मिळाली तर अहिर हे 3 लाख 25 हजार 623 मते घेऊन निवडून आलेत. तर सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम हंसराज अहिर यांच्याच नावावर आहे. 2014 ला काँगेसचे उमेदवार संजय देवतळे यांना त्यांनी 2 लाख 29 हजार मतांनी पराभूत केले. अहिर यांना 5 लाख 8 हजार 49 मते मिळाली तर देवतळे यांना 2 लाख 71 हजार 780 मते मिळाली. सर्वाधिक उमेदवारी मिळण्याचा विक्रम अहिर यांच्याच नावावर आहे. त्यांना सलग पाच वेळा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी हा विक्रम माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या नावावर होता. सर्वाधिक वेळा निवडून येण्यात हंसराज अहिर आणि शांताराम पोटदुखे यांचे नाव पुढे आहे. शांताराम पोटदुखे हे 1980, 1984, 1989 आणि 19891 ला कॉंग्रेच्या तिकिटावर निवडून आलेत तर अहिर हे 1996, 2004, 2009 आणि 2014 ला निवडून आलेत. 2019 ला निवडून आल्याच शांताराम पोटदुखे यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आले. आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त उमेदवार हे 1996 च्या निवडणूकित लढले. तब्बल 24 उमेदवार यावेळी उभे होती. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील ही सर्व माहिती रंजक आहे.
Last Updated : Mar 31, 2019, 11:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.