ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : तीन वर्षात ताडोबात पाच वाघांची शिकार तर, 32 वन्यजीवांचा मृत्यू

author img

By

Published : Dec 4, 2020, 5:03 PM IST

Updated : Dec 4, 2020, 5:48 PM IST

काही वर्षांपूर्वी देशात राज्यातील वाघांची कमी होणारी संख्या हा चिंतेचा विषय होता. मात्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र पकल्पातील चांगल्या व्यवस्थापनामुळे आता वाघांची संख्या वाढत आहे. मात्र, तरी देखील काही अपघात आणि शिकारीच्या घटना होत असल्याचे समोर आले आहे.

Tadoba Andhari
ताडोबा-अंधारी

चंद्रपूर - वाघांचे नंदनवन म्हणून जगप्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित समजला जातो. ताडोबा व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनामुळे वाघांची संख्या अधिक झाली असून आता त्यांना अधिवास कमी पडू लागल्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ ताडोबातच नव्हे तर त्यालगतच्या परिसरामध्येही सहज वाघांचा वावर होताना दिसतो. मात्र, ही स्थिती वाघांसाठी जीवघेणी ठरत आहे.

तीन वर्षात ताडोबात पाच वाघांची शिकार झाल्याचे समोर आले आहे

तृणभक्षी वन्यजीवांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेतात जिवंत विद्युततारा सोडून ठेवतात. काहीवेळा नेमके वाघच याचे बळी ठरतात. २०१८ ते २०२० या कालावधीत अशा प्रकारच्या घटनांमध्ये पाच वाघांचा जीव गेला आहे. अशा प्रकारच्या घटनांची नोंद ही अपघात म्हणून नव्हे तर शिकार म्हणून केली जाते. वाघांसोबतच या काळात 32 वन्यजीवांचाही मृत्यू झाला. यामध्ये रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय आणि बिबट्यांचा समावेश आहे. यातील काहींची शिकार केली गेली तर, काहींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अशा घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 50 आरोपींना वनविभागाने अटक केली आहे.

असे आहे ताडोबा -

राज्यातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा उल्लेख होतो. 1 हजार 724 वर्ग किलोमीटर एवढे क्षेत्रफळ या प्रकल्पाचे आहे. कोअर झोन आणि बफर झोन अशा दोन वर्गात या प्रकल्पाची मुख्यत्वे विभागणी केलेली आहे. कोअर झोन म्हणजे जिथे सर्वाधिक घनदाट जंगल आणि जैवविविधता आहे व मानवी वस्ती नाही. तर बफर झोनमध्ये जंगल कमी व काही प्रमाणात मानवी वस्तीही आहे. याभागात अनेकांची शेती देखील आहे.

'या' घटनांमध्ये गेले वाघांचे बळी -

कोअर झोनमध्ये वन्यजीवांची शिकार होतच नाही. मात्र, बफर झोनमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. अनेकदा वन्यजीवांच्या मांसासाठी जाळे आणि फासे लावले जातात. तर काही ठिकाणी जंगलातील तृणभक्षी प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी जिवंत विद्युतप्रवाह तारेतून सोडला जातो. असे करणे हा शिक्षा पात्र गुन्हा आहे. विद्युतप्रवाहांच्या जाळ्यांमध्ये वाघ देखील शिकार झाले आहेत. 2018 ते 2020 या दरम्यान अशा पाच घटना झाल्या आहेत. 2018 मध्ये शेत सर्वे क्रमांक 42 येथे विद्युत प्रवाहामुळे एका वाघाचा मृत्यू झाला. 2019 मध्ये कंपार्टमेंट क्रमांक 123 येथे वाघाच्या बछड्यांचा तारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला. तर 2020 मध्ये सीतारामपेठ येथे एका वाघिणीची आणि सीटीपीएस इराई धरण परिसरात दोन बछड्यांची शिकार करण्यात आली. ताडोबा व्यवस्थापनाच्या चोख बंदोबस्तामुळे अशा अनेक घटना टळल्या आहेत. मात्र, तरीही अशा प्रकारे होणारा वाघांचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे. भविष्यात याबाबत आणखी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण वाघ आहे म्हणूनच जंगल आहे आणि जंगल आहे म्हणूनच पर्यावरण आहे.

उपाययोजनांसाठी प्रयत्न होणे गरजेचे -

अशा प्रकारच्या घटना म्हणजे हा एक प्रकारचा मानव-वन्यजीव संघर्षच आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. ताडोबा प्रकल्पालगत असलेल्या शेती असणाऱया शेतकऱयांना तृणभक्षी वन्यजीवांच्या प्रादुर्भाचा सामना करावा लागतो. ही जनावरे उभी पीके फस्त करून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. वनविभागाकडून त्यांना नुकसानभरपाई देखील त्वरित मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून ते विद्युत प्रवाहाचा वापर करतात. ज्यात वन्यजीव आणि वाघांचा बळी जातो. याबाबत व्यापक पद्धतीने जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी ठोस उपक्रम राबवणे आवश्यक आहे. गुन्हे करण्याची प्रवृत्ती असलेल्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होणेही आवश्यक आहे. तरच अशा घटनांना पूर्णपणे आळा घालता येईल.

2018 मध्ये घडलेल्या घटना -

२०१८मध्ये अशा 18 घटना घडल्याची नोंद आहे. 12 घटनांमध्ये अज्ञात वाहनांच्या धडकेने वन्यजीवांचा मृत्यू झाला. तर, सात घटनांमध्ये त्यांची शिकार करण्यात आली. त्यात एका वाघाचा देखील समावेश आहे. शिकार आणि अपघातात रानगवा, चितळ, भेडकी, नीलगाय माकड, सांबर, घोरपड तसेच कासवाचा समावेश आहे. यासाठी 26 आरोपींना अटक करण्यात आली.

2019 मध्ये घडलेल्या घटना -

या वर्षी 11 घटना घडल्या. यामध्ये एक अपघाताची घटना वगळता सर्व घटना या शिकारीच्या आहेत. यापैकी एक वाघाचा बछडा तारांच्या फासात अडकून मृत पावला. या वर्षी प्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी 24 आरोपींना अटक करण्यात आली.

2020 मध्ये घडलेल्या घटना -

चालू वर्षात अशा प्रकारच्या पाच घटना घडल्या आहेत. 10 जूनला सीतारामपेठ क्षेत्रात एका वाघिणीची शिकार करण्यात आली. तर, 14 जूनला इराई धरण परिसरात दोन वाघाच्या बछड्यांना ठार करण्यात आले. इतर घटनांमध्ये अन्य प्राण्यांची शिकार करण्यात आली. या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Dec 4, 2020, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.