ETV Bharat / state

Meningococcal Meningitis - 4 लाख 32 हजार मुलांना मिळणार मेंदुज्वराची लस; मोहिमेचा ब्रम्हपुरी येथून शुभारंभ - गडचिरोली

जापनीज इन्सेफेलायटीज (मेंदूज्वर) (Meningococcal Meningitis) या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यू होतो. याला रोखण्यासाठी 1 ते 15 वयोगटातील जिल्ह्यातील 4 लाख 32 हजार बालकांना लस देण्यात येणार आहे.

Meningococcal Meningitis
Meningococcal Meningitis
author img

By

Published : Jan 4, 2022, 7:20 AM IST

चंद्रपूर : जापनीज इन्सेफेलायटीज (मेंदूज्वर) (Meningococcal Meningitis) या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यू होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. याची दखल घेत बालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून 1 ते 15 वयोगटातील जिल्ह्यातील 4 लाख 32 हजार बालकांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ब्रम्हपुरी येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांच्या हस्ते करण्यात आले.

मोहिमेचा ब्रम्हपुरी येथून शुभारंभ

ब्रह्मपुरी येथे नेवाजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालयात जॅपनीज इन्सेफेलायटिस या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा रिता ऊराडे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी, प्रभाकर सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. खिल्लारे उपस्थित होते.

डास चावल्याने मेंदूज्वर
धानाचे उत्पादन करताना निर्माण होणारे जे डास असतात ते चावल्याने मेंदुज्वर होण्याची शक्यता असते. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहे. बालकांना मेंदुज्वर होणार नाही याची काळजी सरकारने घेतली असून सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

हेही वाचा - Bulli Bai App Case : मुंबई सायबर सेलने 21 वर्षीय विद्यार्थ्याला बंगळुरूमधून घेतले ताब्यात

काय आहे मेंदूज्वर
जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदुज्वर) हा आजार प्रामुख्याने 15 वर्षाखालील मुलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा विषाणूजन्य आजार आहे. जे. ई आजाराचा विषाणू माणसाच्या शरीरामध्ये क्युलेक्स डांसामार्फत प्रवेश करतो. व त्यानंतर विविध लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. या आजारामुळे रुग्णांमध्ये 30 टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. तर 40 टक्के रुग्णांमध्ये मेंदुच्या पेशी मृत झाल्यामूळे कायमचे शारीरिक व मानसिक अपंगत्व येऊ शकते. त्यामूळे 15 वर्षाच्या आतील वयोगटात अपंगत्व येण्याचे प्रमाण जास्त असते.

जिल्ह्यात लसीकरण

चंद्रपूर जिल्ह्यात 1 ते 15 वयोगटातील शहरी तथा ग्रामीण भागातील 3 लक्ष 56 हजार 313 व चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 76 हजार 25 असे जिल्ह्यातील एकूण 4 लक्ष 32 हजार 338 सर्व मुलां-मुलींना लसीकरण करण्याचे उदिष्टय आहे. ब्रम्हपूरी तालूक्यात 36 हजार 945 मुलां-मुलींना लसीकरणाचे करावयाचे असल्याने जॅपनिज एन्सेफलायटीज (जे.ई) लसीकरणामूळे मेंदूज्वर या आजारापासून बालकांचे संरक्षण होणार आहे. या लसीकरणामुळे जे.ई (मेंदूज्वर) या आजारापासून बचाव करण्यास मदत होणार आहे. या लसीचा कुठलाही दृष्यपरिणाम होणार नाही, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा - BMC issues Fresh Guidelines : मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जारी; वाचा नियम...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.