ETV Bharat / state

चंद्रपुरात एसबीआयमध्ये 14 कोटींचा घोटाळा; बँक मॅनेजरसह 15 जणांना अटक - चंद्रपूर स्टेट बँक ऑफ इंडिया घोटाळा

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ( NCP leader Rajeev Kakkad ) यांनी चंद्रपूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील घोटाळा सर्वप्रथम समोर आणला. जानेवारी 2020 मध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची गंभीरता समोर आणली. सिनर्जी वल्ड, देऊल कन्स्ट्रक्शन भद्रावती आणि डीएसके बिल्डर्सने आपली फ्लॅट विकायला काढली. हा फ्लॅट घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी खोटी कागदपत्रे ( Bogus certificates for loan ) सादर केली.

स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया
author img

By

Published : Mar 1, 2022, 6:00 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक मोठा घोटाळा झाला असल्याचे समोर ( State bank scam in Chandrapur ) आला आहे. यात एसबीआयला तब्बल 14 कोटी 26 कोटींचा चुना लावण्यात आला आहे. बिल्डर लॉबी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ( corruption with builder lobby ) हा घोटाळा झाला आहे. यात बँके मॅनेजरसहित बँकेचे इतर अधिकारी-कर्मचारी, एजंट आणि कर्ज घेणारे अशा 15 आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ( NCP leader Rajeev Kakkad ) यांनी चंद्रपूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील घोटाळा सर्वप्रथम समोर आणला. जानेवारी 2020 मध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची गंभीरता समोर आणली. सिनर्जी वर्ल्ड, देऊल कन्स्ट्रक्शन भद्रावती आणि डीएसके बिल्डर्सने आपली फ्लॅट विकायला काढली. हा फ्लॅट घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी खोटी कागदपत्रे ( Bogus certificates for loan ) सादर केली. त्यामध्ये मोठ्या रकमेसाठी ग्राहकांनी अर्ज केले होते. बिल्डर लॉबी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ज्यांची क्षमता 15 ते 20 लाखांची आहे अशांना 50 ते 60 लाख कर्ज देण्यात आले. 70 ते 80 कोटींचे कर्ज चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

हेही वाचा-Fake Kidnapping Thane : 16 वर्षीय विद्यार्थीनीने परीक्षेच्या भीती पोटी स्वत:च रचला अपहरणाचा बनाव

बँक अधिकाऱ्यांची सारवासारव
कक्कड यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांना भेटून हा प्रकार उजेडात आणून दिला. मात्र बँक अधिकाऱ्यांनी आमची अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे सांगत सारवासारव केली. ज्या गंभीरतेने याचा तपास व्हायला हवा होता तो झाला नाही. अखेर कक्कड यांनी याची तक्रार थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. त्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. या चौकशीमध्ये 14 कोटी 26 लाख 61 हजार 700 चा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा-Thane Crime News : उल्हासनगरमध्ये अज्ञाताकडून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक

बँकच्या आदेशानुसार पोलीस तक्रार
8 मार्च 2020 ला एसबीआय, चंद्रपूर मुख्य शाखेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. 44 कर्ज प्रकरणात बनावट आयटी रिटर्न भरून एजंट मार्फत गृहकर्ज घेतल्याचे समोर आले. बिल्डर्स लॉबी, बँकेचा अधिकृत एजंट, बँक मॅनेजर आणि कर्ज अधिकारी यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू होता. त्यामुळे कर्जासाठी लागणारी आवश्यक मालमत्ता त्याची किंमत दुप्पट दाखवून दुप्पट कर्ज दिले जात होते. या प्रकरणात तीन बँकेचे अधिकारी एक एजंट आणि 11 कर्जधारकांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा-Principal Beating Student in Nashik : विद्यार्थ्याला बेदम मारहाण, महिला प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांचा प्रतिसाद नाही
हे एकूणच प्रकरण गंभीर आहे. या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

अशी आहेत आरोपींची नावे

  1. महेश रामटेके
  2. वंदना विजयकुमार बोरकर
  3. योजना शरद तिरण
  4. शालिनी मनिष रामटेके
  5. मनिष बलदेव रामटेके
  6. मनिषा विशाल बोरकर
  7. वृंदा कवडू आत्राम
  8. राहुल विनय रॉय
  9. गजानन दिवाकर बंडावार
  10. राकेशकुमार रामकरण सिंग
  11. गणेश देवराव नैताम
  12. गीता गंगादीन जागेट
  13. पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी
  14. विनोद केशवराव लाटेलवार
  15. देवीदास श्रीनिवास कुलकर्णी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.