चंद्रपुर - जिल्ह्यातील कोरपना तालूक्यातील नारंडा येथे वीज कोसळल्याने तब्बल 12 बकऱ्या ठार झाल्या आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ही घडली. कोरपना तालूक्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कोरपना तालुक्यातील नारंडा परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास वादळी पाऊस झाला. दरम्यान, चराई करीत असलेल्या बकऱयांच्या कळपावर वीज कोसळली. यात 12 बकऱ्याचा मृत्यू झाला. तर वादळी पावसाचा फटका शेतीला ही बसला. मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.