ETV Bharat / state

चंद्रपुरात 24 तासात 1055 रुग्णांची कोरोनावर मात, 1511 नवे रुग्ण

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1055 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1511 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 34 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुक्त
कोरोनामुक्त
author img

By

Published : Apr 24, 2021, 12:48 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1055 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1511 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 34 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 49 हजार 494 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 34 हजार 579 झाली आहे. सध्या 14 हजार 182 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 49 हजार 36 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 92 हजार 632 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

नियमांचे पालन करा- जिल्हाधिकारी
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - रुग्णालयातील अग्निशामक सेवा आणि भारतातील रुग्णालयातील आगीच्या घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.