मुंबईत मतदार नोंदणीसाठी २ व ३ मार्चला विशेष मोहीम - मतदार नोंदणी
१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी. या उद्देशाने नुकतेच २३ आणि २४ फेब्रुवारीला विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमे वेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुंबई - आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या मुंबईतील नागरिकांकरता मतदार नोंदणीसाठी २ आणि ३ मार्चला विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी दिवसभर प्रभाग क्र.१७५ कलिना मतदार संघातील नागरिकांसाठी कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम येथील ऑरचीड इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.
१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी. या उद्देशाने नुकतेच २३ आणि २४ फेब्रुवारीला विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमे वेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारत आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८ अचे अर्ज उपलब्ध आहेत. तसेच नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध आहे.
संकेतस्थळ व टोल फ्री क्रमांक मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय साहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली असल्याचे केंद्रस्तरीय सहायक सी. बी. पुजारी यांनी सांगितले.