ETV Bharat / state

गुजराती भाषिकाला पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करा - विजय रुपानी

author img

By

Published : Apr 27, 2019, 11:58 PM IST

देश स्वतंत्र झाल्यावर गुजराती समाजाने मुंबई उभारण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. नरेंद्र मोदी हे गुजराती भाषिक असून त्यांना पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी गुजराती भाषिकांनी मतदान करावे, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केले.

विजय रुपानी

मुंबई - ईशान्य मुंबईमधील भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सभा घेतली. घाटकोपर येथील गुजराती भाषिक वस्त्यांमध्ये रोड शो केला. त्यानंतर ते भानुशाली वाडी येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, प्रवीण छेडा, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, नगरसेवक परमेश्वर कदम आणि भालचंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.

विजय रुपानी यांची घाटकोपरमध्ये सभा

गुजराती भाषेत केलेल्या भाषणात रुपानी यांनी मजबूत सरकार देण्यासाठी मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन गुजराती बांधवांना केले. तसेच काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याने त्यांच्या अनेक नेत्यांवर केसेस दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत. मोदी स्वतः खात नाहीत आणि इतरांनाही खाऊ देत नाहीत, यामुळे मोदींचे सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचे रूपानी यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी जैन, कच्छी आणि गुजराती भाषिकांनी सकाळी दहा वाजण्याच्या आत मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले.

Intro:मुंबई
देश स्वतंत्र झाल्यावर गुजराती समाजाने मुंबई उभारण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. नरेंद्र मोदी हे गुजराती भाषिक असून त्यांना पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी गुजराती भाषिकांनी मतदान करावे असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केले.
Body:ईशान्य मुंबईमधील भाजपा उमेदवार मनोज कोटक यांच्यासाठी रुपानी यांनी घाटकोपर येथील गुजराती भाषिक वस्त्यांमध्ये रोड शो केला. त्यानंतर भानुशाली वाडी येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, प्रवीण छेडा, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, नगरसेवक परमेश्वर कदम, भालचंद्र शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गुजराती भाषेत केलेल्या भाषणात रुपानी यांनी मजबूत सरकार देण्यासाठी मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याने त्यांच्या अनेक नेत्यांवर केसेस दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत. मोदी स्वता खात नाहीत आणि इतरांनाही खाऊ देत नाहीत यामुळे मोदींचे सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचे रूपानी यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी जैन, कच्छी आणि गुजराती भाषिकांनी सकाळी दहा वाजण्याच्या आत मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.