ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्ही. आर. शास्त्री

डॉ. शास्त्री हे कर्नाटकातील सुरतकल येथे असलेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील खनन अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आहेत. त्यांनी आयआयटी, वाराणसी येथून एम.टेक व पीएच.डी. प्राप्त केली असून उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ
author img

By

Published : Mar 7, 2019, 1:26 AM IST

मुंबई - राज्यातील तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्या लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटु) कुलगुरुपदी डॉ. वेदाला रामा शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज बुधवारी डॉ. शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. देवांग खक्कर तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

डॉ. शास्त्री यांची नियुक्ती ५ वर्षाच्या कार्यकाळासाठी केली आहे. कुलगुरू डॉ. विलास गायकर यांचा कार्यकाळ १ मार्च २०१९ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे बाटुच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

Intro:डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्ही. आर. शास्त्री यांची नियुक्ती Body:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्ही. आर. शास्त्री यांची नियुक्ती 

मुंबई, ता. 6 : राज्यातील तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्या
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटु) कुलगुरुपदी डॉ. वेदाला रामा शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज बुधवारी, 6 मार्च रोजी डॉ. शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
डॉ. शास्त्री हे सुरतकल, कर्नाटक येथे असलेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील खनन अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आहेत. त्यांनी आयआयटी, वाराणशी येथून एम.टेक व पीएच.डी. प्राप्त केली असून उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. देवांग खक्कर तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा केली. 
डॉ. शास्त्री हे सुरतकल, कर्नाटक येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील खनन अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक पदी कार्यरत आहेत. 
राज्यपालांनी डॉ. शास्त्री यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी केली आहे. कुलगुरू डॉ. विलास गायकर यांचा कार्यकाळ 1 मार्च 2019 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे बाटुच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. Conclusion:डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्ही. आर. शास्त्री यांची नियुक्ती 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.