ETV Bharat / state

उत्तर मुंबईची शान मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पहायला मिळेल, गोपाळ शेट्टींचा दावा - गोपाळ शेट्टी

मालाड आणि बोरिवली विधानसभेतूनच सर्वांत जास्त मतांची आघाडी भाजपच्या पदरी पडेल. २०१४ चा रेकॉर्डब्रेक करुन ५ लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.

गोपाळ शेट्टी
author img

By

Published : May 19, 2019, 7:19 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुक २०१९ चा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निकालाबाबत सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना उत्तर मुंबईचे विद्यमान भाजप खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी २३ तारखेला पुन्हा एकदा उत्तर मुंबईची शान मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया

गोपाळ शेट्टी म्हणाले, उत्तर मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान झाले आहे. मालाड आणि बोरिवली विधानसभेतूनच सर्वांत जास्त मतांची आघाडी भाजपच्या पदरी पडेल. २०१४ चा रेकॉर्डब्रेक करुन ५ लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार. २३ तारखेला निकाला दिवशी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

गोपाळ शेट्टी २०१४ ला मुंबईत ४ लाख ४५ हजार मतांची सर्वाधिक आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केला होता.

Intro:लोकसभा निवडणुक 2019 चा निकाल स्पष्ट होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. एकूणच सर्वत्र निकाल काय लागेल याची धाकधूक पाहायला मिळतेय. मात्र उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे खासदार व उमेदवार गोपाळ शेट्टी निश्चित पाहायला मिळाले. 23 तारखेला पुन्हा एकदा उत्तर मुंबईची शान मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळेल असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी ई टीव्ही शी बोलताना व्यक्त केला.

Body:2014 ला मुंबईत 4 लाख 45 हजार मतांची सर्वाधिक आघाडी घेऊन गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा पाडाव करत विजय मिळवला होता. तसाच सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा पराक्रम उत्तर मुंबई करेल. 23 तारखेला निकाला दिवशी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असे गोपाळ शेट्टी म्हणाले.

Conclusion:यंदा उत्तर मुंबईतील बोरिवली विधानासभेतून सर्वाधिक मतदान झालं . यंदा मालाड व बोरिवली विधानसभेतूनच सर्वांत जास्त मतांची लीड भाजपच्या पदरी पडेल. 2014 चा रेकॉर्डब्रेक करून 5 लाख मतांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.