नागपूर - कामनानगर येथे मागील आठवड्यात तृतीयपंथीमध्ये पैशाच्या वाटणीवरून भांडणे झाली होती. यात चमचम नावाची तृतीयपंथी जखमी झाली होती. तिचा सोमवारी मृत्यू झाला. कळमना ठाण्याच्या पोलिसांनी चमचमवर हल्ला करणारे उत्तम बाबा सेनापती आणि इतर साथीदारांवर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
पैशाच्या वाटणीवरून नागपूरमध्ये ४ जूनला तृतीयपंथीच्या दोन गटात राडा झाला. यावेळी प्रसिद्ध तृतीय पंथी चमचम उर्फ प्रविण प्रकाश गजभियेवर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली. मागील ७ दिवसांपासून तिच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गेल्या २ दिवसांपासून तिची प्रकृती ढासळत गेल्याने अखेर सोमवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.