मुंबई - पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या महिलांच्या कर्तुत्वाला सलाम केला जातो. तरी महिलांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचारातसुद्धा वाढ होत असल्याचे समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्कारासारख्या घटनात वाढ झाल्याने महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
ईटीवी भारत रिपोर्ट
जवळपास २ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात २०११ च्या जगणनेनुसार महिलांची लोकसंख्या जवळपास ८५ लाख २२ हजार ६४१ एवढी आहे. गेल्या ४ वर्षांत मुंबई शहरात मात्र महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर वाढलेले लैंगिक अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
विभाग एकूण बलात्काराचे गुन्हे
ईशान्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ६९०
ईशान्य पश्चिम मुंबई (२०१३ ते २०१८) - ८२४
ईशान्य पूर्व मुंबई (२०१३ ते २०१८) - ५४५
ईशान्य मध्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ७३०
दक्षिण मध्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ६७७
दक्षिण मुंबई (२०१३ ते २०१८) - ५१६
महिलांच्या बाबतीत बलात्काराच्या घटनेत वाढ होत असताना दुसरीकडे अलपवयीन मुलींवर सुद्धा लैंगिक अत्याचारांच्या घटनात वाढ झाली असून २०१५-१६ साली ८७१ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. २०१६-१७ सालात ९१३ गुन्हे घडले असून हेच प्रमाण वाढत २०१७-१८ या काळात १०२० अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. २०१५ पासून २०१८ पर्यंत मुंबई शहरात एकूण २८०४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडले आहेत. यामुळे मुंबई महिलांसाठी, अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)