मुंबई- नॅशनल रेल्वे मजदूर युनियन तर्फे आज भायखळा येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन कॉ.शिवगोपाल मिश्रा यांचा नेतृत्वाखाली करण्यात आले.
भायखळा सहित रेल्वे प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत ते मागे घेण्यात यावे, कारखान्याचे होणारे खाजगीकरण बंद करा,रेल्वेत रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्यात, रेल्वे मध्ये काम करणाऱ्या महिलाचा सुरक्षेवर लक्ष द्यावे, कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा इंसेंटिव्ही व बोनस लवकर द्यावा,अशा एकूण 20 मागण्या घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.