Loksabha Election Live : गौतम गंभीर, विराट कोहली, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकाच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. आज ९७९ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये कैद होईल. उत्तर प्रदेश -१४, हरियाणा -१०, बिहार -८, मध्यप्रदेश-८, पश्चिम बंगाल -८, नवी दिल्लीतील ७ जागांचा समावेश आहे. सुमारे १ लाख मतदान केंद्रांवर १० कोटी १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वाचा सविस्तर...
मुंबई विमानतळावर मनोरुग्णाची आत्महत्या
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील एमसीपीएल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका मनोरुग्ण युवकाने शनिवारी आत्महत्या केली. अक्षय राजवीर सारस्वत (३१) असे या मनोरुग्णाचे नाव आहे. आत्महत्या करतानाच त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर...
बँकेचा अजब कारभार; खात्यावर एक हजार रूपयेही नसलेल्या खातेदाराला केले 'लखपती'
वाशिम - मालेगाव येथील छोटे हॉटेल व्यावसायिक असलेले दिलीप घुगे व त्यांची पत्नी सुनंदा दिलीप घुगे यांना 'दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँके'च्या मालेगाव शाखेने लखपती दाखवले. त्यांच्या संयुक्त खात्यात 3 लाख रुपये व त्यांच्याकडे शेती नसतानाही गारपीट नुकसानीचे 9 हजार रुपये जमा झाल्याचे पासबुकमध्ये नोंद दिसताच त्यांना मनस्ताप झाला आहे. वाचा सविस्तर...
नालेसफाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, सचिन अहिर यांचा इशारा
मुंबई - मुंबईकरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पालिका प्रशासन सातत्याने कानाडोळा करत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाईची कामे चांगली व्हायला हवीत. मात्र, नालेसफाईत निष्काळजीपणा केला जात आहे. असा निष्काळजीपणा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे. वाचा सविस्तर...
मुंबई आणि चेन्नईत रंगणार अंतिम सामना, कोण मारणार बाजी?
मुंबई - गेल्या दीड महिन्यांपासून क्रिकेटरसिकांसाठी मेजवाणी ठरलेल्या आयपीएलच्या या सीझनचा आज शेवटचा दिवस आहे. आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. जेतेपदासाठी चेन्नईला मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. वाचा सविस्तर...