दुष्काळामुळे मोडावे लागले पोरीचे लग्न; बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा
बीड- सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने आमच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलंय. घरची पाच एकर जमीन असूनही मोलमजुरी करून जगावं लागतंय. मागील दोन वर्षांपासून शेतीतून एक नवा पैसा देखील उत्पन्न मिळाले नाही. एवढेच काय तर दीड- दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न जमलं होतं, मात्र खिशात पैसा नव्हता म्हणून काळजावर दगड ठेवून पोरीचं लग्न मोडावं लागलं. वाचा सविस्तर...
नगरमधील घटना ऑनर किलिंग नाही? आरोपींना प्रकरणातून वगळण्यासाठी पोलिसांचा न्यायालयात अर्ज
अहमदनगर- निघोज येथील जळीत कांड हे पोलीस तपासात ऑनर किलिंग नसल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मृत रुक्मिणीचे वडील, चुलते आणि मामा यांचा जळीत प्रकरणाशी संबंध नाही, असे पोलिसांनी न्यायालयात अर्जाद्वारे सांगितले आहे. वाचा सविस्तर...
सॅम पित्रोदांनी 'त्या' वक्तव्याबद्दल माफी मागावी - राहुल गांधी
पंजाब - सॅम पित्रोदा यांनी १९८४ च्या शीख दंगलीबद्दल केलेले वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
देशाला काळ्या इंग्रजांपासून मुक्त करा - सिद्धू
नवी दिल्ली - काँग्रेस पक्ष मौलाना आझाद आणि महात्मा गांधींचा आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली. ते इंदूर येथे बोलत होते. वाचा सविस्तर...
आसाममध्ये तलावात पडलेल्या हत्तीच्या पिल्लाची सुटका
कामरूप - राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य वन्य विभागाने तलावात पडलेल्या हत्तीच्या पिल्लाची सुटका केली. हे हत्तीचे पिल्लू दीपोर बील तलावात शुक्रवारी पडले होते. हा तलाव कामरूप जिल्ह्यात गुवाहाटी शहराच्या नैऋत्येकडे आहे. वाचा सविस्तर...