मुंबई - राजे संभाजी सभागृहापासून सकाळी ८ वाजता मुलुंडमधील महिला, मुली आपल्या परंपरेनुसार नऊवारी साडी परिधान करून मोठ्या जल्लोशात शोभायात्रा मध्ये सहभागी झाल्या आहेत. सोबतच पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करून शोभायात्रा मध्ये जल्लोष निर्माण केला आहे.
मुलुंड पूर्वेतील राजे संभाजी सभागृहाजवळून मुद्रा संस्थने गुडीपाडव्यानिमित्त शोभायात्रा आयोजित केली आहे. गुढीपाडवा शोभायात्रा सकाळी मोठ्या संख्येने महिला, मुली पारंपरिक मराठी वेशभूषा करून मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले आहेत. महिलांनी मुलुंडच्या जागोजागी संस्कार भारतीतर्फे मोठया प्रमाणात रांगोळी काढली आहे. गुढीपाडवा शोभायात्रामध्ये महिला लेझीमवर ताल धरत आहेत. तर, ९० फूट रोडवर एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण केले जात आहे.