ETV Bharat / state

पावसामुळे लोकलसह रस्ते वाहतुकीवर परिणाम, कार्यालयांतील कामकाज ठप्प

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पाऊस सुरु झाला.पावसामुळे सखल भागात तसेच रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. सखल भागात पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पाऊस
author img

By

Published : Jul 8, 2019, 3:57 PM IST

मुंबई :- पावसाने मुंबईत सोमवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्याने मध्य रेल्वेवरील विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार स्टेशनदरम्यान रुळावर पाणी साचले. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8.30 ते 11.30 या वेळात कुलाबा येथे 12.2 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 108.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाऊस

पालिकेच्या पाऊस नोंद करणाऱ्या केंद्रांवर सकाळी 8 ते 12 या चार तासात शहरात धारावी अग्निशमन केंद्र येथे 67 मिलिमीटर, दादर येथे 65 मिलिमीटर, माटुंगा येथे 64.5 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात मरोळ अग्निशमन केंद्र येथे 121 मिलिमीटर, अंधेरी पूर्व येथे 103 मिलिमीटर, विलेपार्ले अग्निशमन केंद्र येथे 100 मिलिमीटर तर पूर्व उपनगरात कुर्ला अग्निशमन केंद्र येथे 120 मिलिमीटर, विक्रोळी अग्निशमन केंद्र येथे 114 मिलिमीटर, चेंबूर येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आजही साकळपासून पाऊस पडल्याने काही सखल भागात पाणी साचले. यात घाटकोपर, विक्रोळी, सायन, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी आदी विभागांचा समावेश आहे. पाणी साचल्याने माटुंगा गांधी मार्केट येथील बसची वाहतूक भाऊ दाजी रोडवर वळवण्यात आली. तर सायन रोड नंबर 24 येथील वाहतूक रोड नंबर 3 येथून वळवण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या लालबाग पुलावर एका ट्रकचा अपघात झाला होता. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. हा ट्रक पुलावरून खाली पडला असता तर आणखी मोठा अपघात घडला असता. मात्र पोलिसांनी वेळीच हा ट्रक बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. ठाणे आणि दिवा दरम्यान पाऊस जोरात असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावर वडाळा रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. बिघाड दुरुस्त झाल्यावर या ठिकाणची वाहतूक सुरु करण्यात आली होती. तरीही वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.

वळवलेले 'बेस्ट'चे मार्ग -
किंग सर्कल, गांधी मार्केट, सायन, संताक्रूझ मिलन सबवे, सायन वल्लभ रोड, प्रतीक्षा नगर, बांद्रा एस व्ही रोड नॅशनल कॉलेज, गोरेगाव मोतीलाल नगर या भागात पाणी भरल्याने बेस्टच्या 36 मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहेत.

एमटीएनएल सेवा ठप्प -
सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या एमटीएनएलची सेवा ठप्प झाली आहे. यामुळे इंटरनेट आणि फोन येणे जाणे बंद झाले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे फोन आणि इंटरनेट वापरले जात असल्याने महापालिका मुख्यालयासह सीएसएमटी परिसरातील कार्यालयांमधील इंटरनेट आणि फोन सेवा बंद आहे. दरम्यान मेट्रोच्या कामामुळे एमटीएनएलच्या केबल्स तुटल्याने ही सेवा बंद आहे. याबाबत एमटीएनएल मेट्रोला नोटीस देणार असल्याचे समजते.

Intro:मुंबई
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात तसेच रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. सखल भागात पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Body:गेल्या दहा दिवसापूर्वी मुंबईत पावसाळा सुरुवात झाली आहे. पावसाने मुंबईत आज आठवड्यच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून हजेरी लावल्याने मध्य रेल्वेवरील विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार स्टेशनदरम्यान रुळावर पाणी साचले. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8.30 ते 11.30 या वेळात कुलाबा येथे 12.2 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 108.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालिकेच्या पाऊस नोंद करणाऱ्या केंद्रांवर सकाळी 8 ते 12 या चार तासात शहरात धारावी अग्निशमन केंद्र येथे 67 मिलिमीटर, दादर येथे 65 मिलिमीटर, माटुंगा येथे 64.5 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात मरोळ अग्निशमन केंद्र येथे 121 मिलिमीटर, अंधेरी पूर्व येथे 103 मिलिमीटर, विलेपार्ले अग्निशमन केंद्र येथे 100 मिलिमीटर तर पूर्व उपनगरात कुर्ला अग्निशमन केंद्र येथे 120 मिलिमीटर, विक्रोळी अग्निशमन केंद्र येथे 114 मिलिमीटर, चेंबूर येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आजही साकळपासून पाऊस पडल्याने काही सखल भागात पाणी साचले. यात घाटकोपर, विक्रोळी, सायन, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी आदी विभागांचा समावेश आहे. पाणी साचल्याने माटुंगा गांधी मार्केट येथील बसची वाहतूक भाऊ दाजी रोडवरून तर सायन रोड नंबर 24 येथील वाहतूक रोड नंबर 3 येथून वळवण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या लालबाग पुलावर एका ट्रकचा अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. हा ट्रक पुलावरून खाली पडला असता तर आणखी मोठा अपघात घडला असता. मात्र पोलिसांनी वेळीच हा ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली. ठाणे आणि दिवा दरम्यान पाऊस जोरात असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावर वडाळा रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. बिघाड दुरुस्त झाल्यावर या ठिकाणची वाहतूक सुरु करण्यात आली असली तरी वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.

बेस्ट मार्ग वळवले -
किंग सर्कल, गांधी मार्केट, सायन, संताक्रूझ मिलन सबवे, सायन वल्लभ रोड, प्रतीक्षा नगर, बांद्रा एस व्ही रोड नॅशनल कॉलेज, गोरेगाव मोतीलाल नगर या भागात पाणी भरल्याने बेस्टच्या 36 मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती.

एमटीएनएल सेवा ठप्प -
सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या एमटीएनएलची सेवा ठप्प झाली. यामुळे इंटरनेट आणि फोन येणे जाणे बंद झाले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे फोन आणि इंटरनेट वापरले जात असल्याने महापालिका मुख्यालयासह सीएसएमटी परिसरातील कार्यालयांमधील इंटरनेट आणि फोन सेवा बंद आहे. दरम्यान मेट्रोच्या कामामुळे एमटीएनएलच्या केबल्स तुटल्याने ही सेवा बंद आहे. याबाबत एमटीएनएल मेट्रोला नोटिस देणार असल्याचे समजते.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.