मुंबई - डोंगरी परिसरातील १०० वर्षे जुनी म्हाडाची इमारत सकाळी कोसळली. ही इमारत ज्या भागात आहे तो भाग अत्यंत दाटीवाटीचा भाग आहे. इथले रस्ते अरुंद बोळ आहे. त्यामुळे दुर्घटना झालेल्या ठिकाणापर्यंत वाहने पोहोचू शकत नाहीत.
बचाव करणारी टीम जरी पोहोचली असली तर त्यांच्याकडे तातडीने ढिगारा उपसण्यासाठी कोणतीही यंत्र सामुग्री नाही. हातांनीच ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विलंब वाढत आहे.
इमारतीत अडकलेल्या जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी अॅम्ब्युलन्सही पोहोचू शकत नसल्यामुळे मेडीकल टीमलाही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
इमारतीजवळ लोकांची गर्दी वाढत असल्यामुळे तोही एक बचाव कार्यातील अडथळा होत आहे. लोकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जखमींना तातडीने योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
या इमारतीत 15 कुटुंब अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातील किती जण घरी होते आणि किती बाहेर याची माहिती मिळू शकलेली नाही.