ETV Bharat / state

दाऊदचा पुतण्या रिजवानला अटक; जाणून 'घ्या' काय आहे नेमके प्रकरण? - मुंबई विमानतळ

मुंबईतल्या दोन व्यवसायिकामध्ये आयात विक्रीच्या पैशावरुन वाद सुरू होता. फईम मचमचने अश्फाक टोपीवाला यांच्याकडे कोणत्याही पैशाची मागणी करू नये, असे व्यापाऱ्याला धमकावले.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 18, 2019, 7:37 PM IST

मुंबई - दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिजवान कासकर याला हवाला रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री मुंबई विमानतळावरून रिजवान (वय ३०) हा देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्या अगोदरच खंडणी विरोधी पथकाने त्यास अटक केली. यानंतर, पोलिसांनी रिजवानला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रिजवानला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांची प्रतिक्रिया

मुंबईतल्या दोन व्यवसायिकामध्ये आयात विक्रीच्या पैशावरुन वाद सुरू होता. यासाठी अश्फाक टॉवेलवाला याने फईम मचमचला सांगितले. फईम मचमचने अश्फाक टोपीवाला यांच्याकडे कोणत्याही पैशाची मागणी करू नये, असे व्यापाऱ्याला धमकावले. यानंतर, व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण गँगस्टरकडे कोणी नेले याचा गोपनीय तपास सुरू झाला. तपासामध्ये आरोपी अहमदरजा अफरोज वधारिया (वय २४) या प्रकरणामध्ये सक्रिय असल्याचा दिसून आला. दुबईवरुन १५ जुलैला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीत अहमदरजा वधारिया याची ओळख दाऊदच्या पुतण्या रिजवान इक्बाल हसन शेख याने फईम मचमच आणि छोटा शकील यांच्याशी करुन दिली होती आणि व्यापाऱ्याला पैसे न मागण्यासाठी धमकावले होते.

PRESS NOTE
प्रेस नोट

पोलिसांनी ही बाब निदर्शनास आल्यानंतर रिजवानचा शोध सुरू झाला. अटकेतून वाचण्यासाठी तो १७ जुलैला दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना याची माहिती मिळताना रिजवानला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीत्या आधारावर अश्फाक टॉवेलवाला याला आज (१८ जुलै) अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना मुंबईतील अजून एका व्यापाऱ्याला धमकावल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.

[18/07 4:58 pm] Alpesh Arvind Karkare: फ्लॅश 

मुंबईतल्या दोन व्यवसायिकामध्ये पैशावरून वाद सुरू होत त्यासाठी एकाने फईम मचमच ला सांगितलं आणि त्यानंतर अश्फाक टोपीवाला यांच्याकडे कोणत्याही पैशाची मागणी करू नये असे संगीतले...त्यानंतर हे प्रकरण गँगस्टर कडे कोणी नेलं याचा तपास सुरू झाला....

त्यामध्ये आरोपी अहमद अफरोज वधारिया आणि अश्फाक टोपीवाला यांनी रिझवान इकबाल कासकर याच्यामार्फत हे प्रकरण गँगस्टर कडे गेल्याचे तपासात समोर आले आहे....

अश्फाक टोपीवाला याला डोंगरी परीसरातून अटक करण्यात आलीय तर रिझवान कासकर याला माहिती मिळताच तो बाहेर पळून जात होता..त्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलीय....

[18/07 4:58 pm] Alpesh Arvind Karkare: आरोपी अहमद वधारिया याने 12 जूनला व्यावसायिकांना फोन केला होता आणि धमकी दिली होती....त्याला आधीच अटक केली आहे...

[18/07 4:59 pm] Alpesh Arvind Karkare: तिन्ही आरोपीना 22 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय....तर अजून या प्रकरणात गँगस्टर मधले कनेक्शन आहे का याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत....

[18/07 4:59 pm] Alpesh Arvind Karkare: आरोपी अहमद अफरोज वधारिया आणि रिझवान कासकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस काढली होती त्यावरूनच त्यांना अटक केली आहे.....

[18/07 5:01 pm] Alpesh Arvind Karkare: आरोपींनी खंडणीसाठी आणखी काही लोकांना धमकावले आहे का याचासुद्धा तपास करण्यात येईल...

[18/07 5:03 pm] Alpesh Arvind Karkare: अहमद वधारिया याच्याविरोधात याआधी सुरत मध्ये गुन्हे दाखल आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.