मुंबई -शिवसेना भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीचा २३-२५ चा अंतिम फॉर्म्युला तयार आहे. मात्र मतदारसंघाचा तिढा कायम असून तो सुटल्यावर लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपचे खासदार असलेल्या भिवंडी व पालघर लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ द्या यावर शिवसेना अडून बसली आहे. भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघा पैकी एक मतदारसंघ शिवसेनेने मागितल्याने युतीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. जागा वाटपाचा तिढा सुटल्यास लोकसभेपुरती युती होईल अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.