ETV Bharat / state

अंबाबाई मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले; भाविकांची प्रचंड गर्दी - temple repoen in state

कोरोनाच्या अनलॉकमध्ये आजपासून अंबाबाई मंदिर जरी दर्शनासाठी खुले केले गेले असले तरी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्येच भक्तांना दर्शन मिळणार आहे. मधल्या वेळेत मंदिर सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. त्यामुळे भक्तांनीसुद्धा याच वेळेत मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ambabai temple reopened in kolhapur
अंबाबाई
author img

By

Published : Nov 16, 2020, 10:08 AM IST

Updated : Nov 16, 2020, 3:28 PM IST

कोल्हापूर - तब्बल 7 महिन्यानंतर करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर उघडले आहे. त्यामुळे पहाटेपासूनच भक्तांनी मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी दाखल झाले असून या भाविकांमध्ये अंबाबाईचे दर्शन मिळणार असल्याने प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

केवळ 2 ते 3 हजार भाविकांना दररोज दर्शन-

नेहमीप्रमाणे अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. मात्र गेल्या 7 महिन्यांपासून अधिक काळ मंदिर बंद असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ 2 ते 3 हजार भाविकांना दररोज दर्शन देण्यात येणार आहे. शिवाय याबाबत नेटके नियोजन देवस्थान समितीने केले आहे.

अंबाबाई मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले

सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 मंदिर असणार खुले -
आजपासून अंबाबाई मंदिर जरी दर्शनासाठी खुले केले गेले असले तरी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्येच भक्तांना दर्शन मिळणार आहे. मधल्या वेळेत मंदिर सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. त्यामुळे भक्तांनी सुद्धा याच वेळेत मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्व दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून बाहेर -

अंबाबाई मंदिरात येण्यासाठी एकूण 4 दरवाजे आहेत. मात्र, त्यातील पूर्व दरवाजातून प्रवेश दिला जाणार असून दक्षिण दरवाजातून भक्तांना बाहेर पडता येणार आहे. मंदिरातील इतर परिसरात सुद्धा भक्तांना फिरता येणार नाही. त्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरात असलेली सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच भक्तांची तपासणी करून आत मध्ये सोडणार -

गेल्या 7 महिन्यात मंदिर प्रशासनातल्या एकाही कर्मचारी पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही. मात्र आजपासून मंदिर सुरू होत आहे. देशभरातून भाविक येत आहेत. त्यामुळे प्रत्येक भाविकांची तपासणी केली जात असून त्यांना सॅनिटायझ करून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. शिवाय मास्क नसेल त्यांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

कासव चौकातूनच अंबाबाईचे दर्शन -

आजपासून अंबाबाई मंदिरात भक्तांना प्रवेश मिळणार असला तरी मंदिरातील कासव चौकातूनच भक्तांना देवीचे दर्शन मिळणार आहे. त्यामुळे मूर्तीच्या जवळ जाऊन घेता येणार नाही. मात्र काही दिवसांनी भक्तांना आणखी जवळ जाऊन दर्शन घेता येणार आहे.

मोफत ऑनलाईन बुकिंगची सुद्धा पुढच्या 4 दिवसात सुविधा -

गेल्या 7 महिन्यांपासून अंबाबाई मंदीरात भक्तांना प्रवेश नव्हता. त्यामुळे भक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. यासाठी भक्तांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे बुकिंग विनामूल्य असणार आहे. जेणेकरून भक्तांची गैरसोय होणार नाही.

लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना प्रवेश नाही -

कोरोनाचा धोका अजुनही कायम आहे. याचा लहान मुलं, जेष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र्र देवस्थान समितीने केले आहे.

देवस्थान समितीच्या 3 हजार 42 मंदिरात सुद्धा नेटके नियोजन -

पश्चिम महाराष्ट्र्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण 3 हजार 42 मंदीरे आहेत. त्यामध्ये सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे येतात. यामध्ये अंबाबाई मंदिरांबरोबरच जोतिबा मंदिर आणि इतर काही महत्वाची मंदिरे सुद्धा येतात. त्याठिकाणी अशाच पद्धतीने नियम बनविण्यात आले असून भाविकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

Last Updated : Nov 16, 2020, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.