ETV Bharat / state

लॉकडाऊनचे उल्लंघन करत मित्राचा वाढदिवस साजरा करणे बेतले जीवावर; विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

author img

By

Published : May 21, 2020, 11:42 AM IST

निखील पाटील या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 15 तरुण चिखली शिवारात मंगळवारी जमले होते. त्यापैकी दिपक शर्मा या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय

youth died drowning well
विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

बुलडाणा- लॉकडाऊनचे उल्लंघन करून मित्राचा वाढदिवस साजरा करणे खामगावच्या तरुणाच्या जीवावर बेतले. १४ ते १५ मित्रांसोबत मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृताचे नाव दीपक शर्मा असून तो खामगाव येथील रहिवासी आहे. या प्रकरणी शर्माच्या १४ मित्रांविरोधात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल जलंब पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खांमगाव येथील १४ ते १५ तरुण निखील पाटील या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंगळवारी रोजी जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली बू. शिवारातील विठ्ठल लाऊडकर यांच्या शेतात जमले होते. बाजूला विहिर असल्याने त्यांच्यापैकी दिपक शर्मा वय ३७, रा. निळकंठ नगर, खामगाव हा तरुण विहिरीत आंघोळीसाठी गेला असता, बराच वेळ परत न आल्याने त्याचा इतरांनी शोध घेतला असता, तो दिसला नाही. तो विहिरीतच आहे की बाहेर आला ? हे निश्चित कुणास माहिती नसल्याने जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी. आर. इंगळे यांना माहिती कळवण्यात आली यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले.

लॉकडाऊनचे उल्लंघन करत मित्राचा वाढदिवस साजरा करणे जीवावर बेतले

घटनास्थळावर दिपक शर्माने ठेवलेले कपडे बाजुलाच असल्याने तो विहिरीतच असणार असा अंदाज बांधून शोधकार्य सुरू केले. विहिरीत सुमारे ३० फुट खोल पाणी असल्याने सर्वप्रथम विहिरीचे पाणी उपसण्यात आले. गोतखोर प्रकाश खवले तसेच संतोष धोटे रा. माटरगाव यांना बोलावून त्यांच्या मदतीने विहिरीत दिपक शर्मा याला शोधण्याचे कार्य सुरू केले. खवले आणि धोटे यांना विहिरीच्या तळाशी दिपकचा मृतदेह त्यांना ६ तासानंतर सापडला. मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.

दिपक शर्मा याचे नातेवाईक प्रशांत शंकर शर्मा यांच्या तक्रारीवरुन १४ जणांविरोधात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी जलंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार पी. आर. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राजेंद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल विनोद राठोड, राजू तायडे , पोलीस पाटील सुनील खडसे, अनंता शिंदे व गावकरी यांनी सहकार्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.