ETV Bharat / state

विधवा, परितक्त्या महिलांच्या समस्या विधिमंडळात मांडणार - डॉ. राजेंद्र शिंगणे - राजेंद्र शिंगणे

Widow Women Council: विधवा महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी, विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळावे यासाठी महात्मा फुलेंनी विधवा महिला परिषदेचे आयोजन केले होते. (Widows and divorced Women Council) या घटनेनंतर आता 100 वर्षांनी बुलडाण्यात आज (रविवारी) विधवा व परितक्त्या महिला परिषद झाली. यावेळी विधवा व परितक्त्या महिलांच्या समस्या विधिमंडळात मांडणार असे आश्वासन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

Widow Women Council
महिला परिषद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 7:52 PM IST

Updated : Dec 10, 2023, 8:13 PM IST

विधवा महिला परिषदेच्या निमित्ताने मत मांडताना आयोजक आणि माजी मंत्री

बुलडाणा Widow Women Council : महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवांसाठी कार्य केले. याला आता शंभर वर्षे उलटून गेली आहेत. बुलडाण्यात प्रा. दत्तात्रेय लहाने यांच्या संकल्पनेतून विधवा परिषद होत आहे. बुलडाण्यातील शिवसाई शाळेसमोर ही परिषद सुरू आहे. सामाजिक बदलाच्या दृष्टीने ही घटना ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. या परिषदेला माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी किरण पाटील उपस्थित होते. (problems of widowed women)

मान्यवरांकडून परिषदेचे कौतुक : यावेळी डॉ. शिंगणे म्हणाले की, सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधवा व परितक्त्या महिलांच्या समस्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून विधिमंडळात मांडणार असल्याचं सांगितलं आहे. तर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी या परिषदेचं कौतुक केलं आहे. यामध्ये कोल्हापूर येथे विधवांसाठी कार्य करणाऱ्या जया कुरणे, लेखिका साधनाताई कोठारी (कोल्हापूर), सातारा जिल्ह्यातील हेराड ग्रामपंचायत सरपंच आणि विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी पुढाकार, ठराव घेऊन कार्य करणारे सुरगोंडा पाटील आदींनी स्वतः फोन करून उपस्थिती दर्शविली आहे.

शतकानंतर होतेय विधवा परिषद : विधवा महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी, विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळावे व त्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होता यावे यासाठी विधवा महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले यांच्या नंतर शंभर वर्षांनी बुलडाणा येथे होणारी विधवा परिषद ऐतिहासिक आहे. याचे नियोजन शिवशाही परिवार व मानस फाउंडेशन द्वारे करण्यात आले. बुलडाणा शहराच्या इतिहासात प्रथमच महिला विधवा परिषदेचे आयोजन करण्यात आले. विधवा महिलांच्या जीवनात अनंत अडचणी उभ्या असतात. सहजीवनाचा साथी सोडून गेल्यानंतर समाजही त्या महिलेस वाऱ्यावर सोडतो. तिच्यावर अनेक बंधने लादली जातात. तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोणही बदलतो. शुभकार्यात मुद्दाम अशा स्त्रीला मागे ठेवलं जातं.

'या' कारणाने परिषदेचे आयोजन : बहुतांश महिला तशाही आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर नसतात. त्यासाठी त्यांना कुटुंबावर अवलंबून राहावे लागते. एकीकडे आर्थिक विंवचना तर दुसरीकडे सामाजिक कुचंबना असताना विधवा पुनर्विवाहाचा विचार कोणाच्या मनी मानसीही येत नाही. या सर्व समस्यांचा विचार करून या विधवा, परितक्त्या महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा:

  1. वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी रेड्यावर यमदूत बसवून अनोखं आंदोलन
  2. ..अन्यथा गाठ मराठ्यांशी; नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा
  3. भिडे वाड्याच्या जागेवर उभी राहणार शाळा; छगन भुजबळ यांची माहिती

Last Updated : Dec 10, 2023, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.