बुलडाणा - जिल्ह्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमधून अजबच प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. स्वॅब न देताच एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला अहवाल कोणाचा आहे. हे मोताळा तालुका अधिकारी राजेंद्र पुरी यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाला कळेनासे झाले आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती शहरभर फिरत असून तो कोण आहे, याबाबत आरोग्य विभागाकडे याचे उत्तर नसून फक्त चौकशी केली जात आहे.
तालुका आरोग्य अधिकारी पुरी यांची आता दुसरी प्रतिक्रिया -
स्वॅब न देताच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा अजब प्रकार शुक्रवारी समोर आला होता. यावेळी ज्याचा हा स्वॅब होता त्या महिलेला आपण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे आरोग्य अधिकारी रवींद्र पुरी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले होते. मात्र आज (शनिवार) रवींद्र पुरी यांनी आपल्या विधानात घुमजाव केले असून आपण प्राथमिक माहितीनुसार ती प्रतिक्रिया दिली होती. हा स्वॅब कोणाचा होता याची चौकशी सुरू असल्याची दुसरी प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
मोताळ्यात पॉझिटिव्ह आलेला तो स्वॅब कोणाचा ? आरोग्य विभाग संभ्रमात
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमधून अजबच प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. स्वॅब न देताच एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला अहवाल कोणाचा आहे. हे मोताळा तालुका अधिकारी राजेंद्र पुरी यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाला कळेनासे झाले आहे.