ETV Bharat / state

धक्कादायक! रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कक्षसेवकाने घेतले 10 हजार रुपये, रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप

शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल एका रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन लावण्यासाठी तब्बल 10 हजार रुपये एका कक्ष सेवकाने घेतल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईकांनी केला आहे.

remdesivir
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 9, 2020, 8:59 PM IST

बुलडाणा - येथील शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल एका रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन लावण्यासाठी तब्बल 10 हजार रुपये एका कक्ष सेवकाने घेतल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याच जिल्ह्यात घडली आहे. आरोग्य प्रशासनाने या घटनेला गंभीरतेने घेऊन तत्काळ 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

डॉ. सुरेश घोलप - जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा

लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील 54 वर्षीय महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला 4 ऑक्टोबर रोजी बुलडाण्याच्या स्त्री कोविड अतिदक्षता कक्षात भरती केले. यावेळी त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले. अशात 5 ऑक्टोबरला अतिदक्षता कक्षात कंत्राटी तत्वावर कार्यरत कक्षसेवक सागर जाधव याने महिला रुग्णाच्या नातेवाईकाला तुमच्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन लावणे गरजेचे आहे. हे इंजेक्शन लावल्याने रुग्ण बरे होतात, असे सांगून विश्वासात घेतले व त्यांच्याकडून 5 हजार रुपये घेतले. नंतर 6 ऑक्टोबरलाही पुन्हा इंजेक्शन लावायचे आहे म्हणत पुन्हा 5 हजार, असे नातेवाईकांकडून एकूण 10 हजार रुपये घेतले. मात्र, 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास या महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

7 ऑक्टोबरच्या सकाळी नातेवाईक रूग्णालयात आले व त्यांनी या घटनेची तोंडी माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना दिली. यावर डॉ. वासेकर यांनी प्रकरणाची बाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांना दिली. डॉ. घोलप यांनी कोविड रुग्णालयात भेट देऊन या बाबतची विचारपूस आरोग्य सेवक सागर जाधवला केली असता ,जाधव यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने नातेवाईकांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी 5 सदस्य चौकशी समिती गठीत केली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मागण्यात आलेल्या 10 हजार रुपयांची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, दोषी कंत्राटी आरोग्य सेवकावर कारवाई केली जाणार, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांनी दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्णासाठी महत्त्वाच्या समजला जाणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारी केला जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातच ही घटना उघळकीस आल्याने याची चर्चा सर्वत्र होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.