बुलडाणा - राहत्या घराची भिंत कोसळून शेख कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घडली. तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी 19 सप्टेंबर च्या मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील मेहकर येथे घडली. शेख असिफ शेख अशरफ (वय 28), शाहिस्ता बी शेख असिफ (वय 25) आणि जुनेद शेख असिफ हा (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. तर जख्मीत शेख तैयार शेख अशरफ (वय 20) आणि सुजान शेख असिफ (वय 8) या दोघांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांचा स्वाभिमानी 'वाघ' आता विधानसभेच्या रणांगणात?
गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी दिवसभर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला. दरम्यान, मेहेकर येथील इमामवाडा चौकात राहणारे शेख कुटुंब गाढ़ झोपेत असताना रात्री 2 वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराशेजारची जूनी मातीची भिंत शेख कुटुंबावर कोसळली. यात कुटुंबातील सर्व पाच जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजारच्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळावर धावून आले.
हेही वाचा - मनसे मुंबई विभाग अध्यक्षांची शुक्रवारी बैठक, विधानसभेबाबत निर्णयाची शक्यता?
मातीखाली दबलेल्या पाच जणांना बाहेर काढून रुग्णालयात भर्ती केले असता डॉक्टरांनी त्यातील पती, पत्नी व लहान बालक असे तीन जणांना मृत घोषित केले. तर दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात पत्नी आठ महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरानी सांगितले.
हेही वाचा - देशातील एकमेव गांधी भवन, जिथे रोज आयोजित होते 'गांधी भजन'...
घटनास्थळाहून नागरिकांनी 108 या नंबर डायल करून अॅम्बुलन्स सुविधा करिता फोन लावले असता आमच्याकडे गाडी उपलब्ध नाही जी गाडी आहे ती नादुरुस्त आहे, अशा प्रकारे सांगण्यात आले. तर काही गाडीवर ड्रायव्हर नाही, काही गाडीवर डॉक्टर नाही या कारणाने नागरिक संतप्त झाले होते. शेवटी खाजगी वाहनाने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.