बुलडाणा - राज्यासाठी चिंताजनक बातमी ( Omicron In Maharashtra ) समोर आली आहे. ती म्हणजे ओमीक्रॉन हा व्हेरीयंट आता डेल्टामध्ये परिवर्तित होत आहे. भरीस भर म्हणून स्प्रेडिंगचा रेट दुप्पट झालेला आहे. ही चिंताजनक बाब असून राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत सध्या कुठलाही निर्णय झालेला नाही. वेळ परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar On Lockdown ) यांनी दिले. नव वर्षाच्या निमित्ताने ते शनिवारी रात्री ते संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
'तोपर्यंत ५० टक्के मर्यादा वाढू शकत नाही' -
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. इम्पिरिकल डेटा गोळा केल्यानंतरही ओबीसींचे राजकीय आरक्षण राहू शकणार नाही. जोपर्यंत १०२ वी घटना दुरुस्ती होत नाही, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढत नाही, तोपर्यंत ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळू शकत नसल्याचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर तर्कवितर्क लढवले जात आहेत
वडेट्टीवारांनी घेतले 'श्रीं'चे दर्शन -
नववर्ष हा चांगला जावा यासाठी अनेक जण नववर्षाची सुरुवात विविध धार्मिक कार्यक्रम किंवा दव दर्शनाने करतात/ यामध्ये काळ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी रात्री संत नगरी शेगावात पोहचून श्रींच्या चरणी ते नतमस्तक झाले. यांनतर त्यांनी मंदिरातच महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांचे संस्थानच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले. यांनतर त्यांनी विश्रामगृहावर पोहचून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत स्वागत सत्कार स्वीकारले.
हेही वाचा - Raosaheb Danve On shivsena : "शिवसेनेत आग लावण्याचे काम माझं नाही"