ETV Bharat / state

विदर्भातल्या नेत्यांनी बँका सांभाळाव्या; दानवेंचा प्रतापराव जाधवांना अप्रत्यक्ष टोला - loksabha

चिखली पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडक  यांच्यासह विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच राजकीय मंडळी उपस्थित होते.

दानवे
author img

By

Published : Mar 5, 2019, 5:25 PM IST

बुलडाणा - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने कामाच्या उद्घाटनाचा चांगलाच सपाटा लावला आहे. अशा उद्घाटनावेळी राजकीय नेते एकमेकांवर चांगलीच कुरघोडी करतांना दिसत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अशाच एका कार्यक्रमाला जिल्हाच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी मंचावर बसलेल्या शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिकास्त्र सोडले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. काही दिवसांआधी स्वबळाची भाषा करणाऱ्या सेनेने हिंदूत्वाच्या मुद्यावर पुन्हा एकदा भाजपचा हाथ धरला. मात्र, पक्ष नेत्यांकडून युतीची घोषणा करण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळत आहे. असाच काहीसा संघर्ष आज चिखली येथे एका पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभावेळी पाहायला मिळाला. यावेळी कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडकयांच्यासह विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच राजकीय मंडळी उपस्थित होते.

विदर्भातील लोकांनी पैसा सांभाळावा आणि आम्ही मराठवाड्यावाल्यांनी माणसे सांभाळावी. कारण विदर्भात बँका चांगल्या चालतात, अशाच एका विदर्भातील बँकेने माझ्या साखर कारखान्याला कर्ज दिले होते, ते मी वेळेत फेडले. यामुळे विदर्भातील लोक माझ्यावर विश्वास दाखवतात, असे कार्यक्रमच्या भाषणावेळी दानवे म्हणाले. हा दानवेंचा प्रतापरावांना मार्मिक टोला होता. कारण प्रतावरावांच्या सारंगधर साखर कारखान्याने बुलडाण्याच्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची ते परत फेड करु शकले नाहीत. त्यामुळे बँकेकडून कारखान्याचा लिलाव करण्यात आला. मात्र, त्यातूनही कर्जाच्या रक्कमेची परतफेड झाली नसल्याने हे प्रकरण आता न्यायालयात आहे. याच पार्श्वभूमीवर दानवेंनी जाधव यांना टोला लगावला. यावेळी माझे आणि खोतकरांचे मनोमिलन झाल्याचेही ते म्हणाले.

Intro:nullBody:Anchor - आगामी लोकसभा निवडणूक बघता सर्वच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी आपापल्या दौर्यामध्ये व्यस्त आहेत. दौऱ्यावर असतांना नेतेमंडली भाषणातून टोला मारणे मात्र सोडत नाहीत. आणि असाच टोला भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांना दिला आहे. सेना भाजप युती झाल्यानंतर काही ठिकाणी विरोधाची ठिणगी कायम आहे. वरून युती जरी दिसत असली तरी काही ठिकाणी मात्र अंतर्गत चित्र वेगळच आहे .  जालना येथे सेना खासदार अर्जुन खोतकर आणि आमच मनोमिलन झालं असल्याच वक्तव्य करत  आपला कार्यक्रम आटोपून खासदार रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख हे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे एका पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभासाठी आले होते. स्टेजवर सेनेचे विद्यमान  खासदार प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडक  यांच्यासह   विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच राजकीय मंडळीचीही उपस्थिती होती. भाषण सुरु असतांना दानवे वेगळ काही बोलतील याकडे सर्वांच लक्ष होत ..आणि तसच झालं शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना टोला लगावत दानवे बोलले कि विदर्भ वाल्यांनी पैसा सांभाळावा आणि आम्ही मराठवाड्यावाल्यांनी माणस सांभाळावी कारण विदर्भात बँका ह्या चांगल्या चालतात ...विदर्भातल्याच बँकांनी माझ्या साखर कारखान्याला कर्ज दिल होत...आणि मी ते वेळेत फेडल....त्यामुळे विदर्भाचा विश्वास माझ्यावरही तेवढाच आहे...असा मार्मिक टोला दानवे यांनी खासदार जाधव यांना लगावला. खा.प्रतापराव जाधव यांच्या सारंगधर शुगर मिल वर शेतकऱ्यांची बँक बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे कर्ज आहे.शुगर मिलाची हर्ससी होवून ती विकल्या गेली यावर ही कर्जाची पूर्ण वसुली न झाल्यामुळे ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे..

byte - रावसाहेब दानवे 

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.