ETV Bharat / state

वीज बिले माफ करण्यासाठी विदर्भवाद्यांचा ४ जानेवारीला उर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव - उर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव

विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे ५ कि.मी. पायदळ विज व विदर्भ मार्च काढत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर घेराव घालण्यात येणार आहे.

movement vidarbha instruments
४ जानेवारीला उर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव
author img

By

Published : Dec 26, 2020, 8:09 PM IST

Updated : Dec 26, 2020, 8:15 PM IST

बुलडाणा - विदर्भातील जनतेचे कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे, २०० युनिटपर्यंत वीज मोफत करावी, विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी यासह इतर मागण्यांसाठी येत्या ४ जानेवारीला उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येईल. या आंदोलनात विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले आहे. येथील पत्रकार भवन येथे आज २६ डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड. वामनराव चटप
..या मागण्यासाठी उर्जामंत्र्यांच्या घराला घेराव -कोरोना काळात संपूर्ण उद्योग, व्यापार, रोजगार बंद होते. जनतेच्या खिशात पैसे नव्हेते, तेव्हाच सरकारने १ एप्रिल पासून २१ टक्के वीज दर वाढ करुन सरकार वीज ग्राहकांकडून ६ हजार कोटी रुपये ५ वर्षात वसूल करणार आहे. तर एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे लॉकडाऊनच्या काळात महावितरणने वीज बिले एकत्र करुन पाठविली. त्यामुळे ५.१० प्रति युनिटच्या स्लॅब दरमधील वीज बिले रु.११.५७ च्या स्लॅबच्या दरापर्यंत गेली. त्यामुळे तिप्पट, चौपट वीज बिल ग्राहकांना आली व महाराष्ट्र शासनाच्या वीज वितरणने विजग्राहकांची लुटमार सुरु केली आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, त्यानंतरचे वीज दर निम्मे करण्यात यावे, शेती पंपाला वीज मुक्त करण्यात यावी, विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे ५ कि.मी. पायदळ विज व विदर्भ मार्च काढत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.

या पत्रकार परिषदेला मुख्य संयोजक राम नेवले, विदर्भ प्रदेश महिला आघाडी रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, तेजराव मुंढे, डॉ. बाबुराव नरोटे, दामोदर शर्मा, रणजीत डोसे, अशोक डांगे, अ‍ॅड. सुरेश वाबखेडे विजय डागा, संजय सुरळकर, गणेश तायडे, हरीदास खांडेभराड, दिनकर टेकाळे, डिगांबर खंड आदी उपस्थित होते.

Last Updated : Dec 26, 2020, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.