बुलढाणा : अंबेवाडी फाट्याजवळून जात असताना टिप्पर क्रमांक (एम. एच 28 बीबी 1299)गिट्टीने भरलेल्या भरधाव टिप्पर आंबेवाडी फाट्याजवळ दुचाकी स्वारास भरधाव टिप्परने दुचाकीस्वार अमोल शिवाजी खोडके (वय २६) व ओम गैभी खोडके (वय २४) रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेडराजा यांना जोराची धडक देऊन उडविले. या भीषण अपघातात अमोल खोडके हा जागीच ठार झाला. तर, दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली : अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला. अपघातग्रस्त युवकांना ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. तसेच, साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार काळे व कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. परंतु, अमोल हा जागीच ठार झाला होता. तर, दुसर्या युवकास तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, नंतर त्याचीदेखील उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. पळून गेलेला आरोपी हा साखरखेर्डा पोलीस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त : विशेष म्हणजे आज मलकापूर पांग्रा येथील आज आठवडी बाजार होता यात शेकडो वाहनांची वर्दळ असते. सदर हा अपघात घडताच मलकापूर पांग्रा व शेंदुर्जन सह परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा ठाणेदार नंदकिशोर काळे व पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे हे घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून दोन्ही शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले होते. या घटनेने अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, भरधाव जाणाऱ्या वाहनांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी चर्चा सुरू होती. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे करत आहे या दुर्देवी घटनेने शेंदूरजन गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी हवेत 350 कोटी, पण राज्य शासन...