ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा अंदाज - बुलडाणा उष्णतेची लाट

विदर्भात अचानक तापमान वाढण्यामागे राजस्थानकडून येणारे उष्ण वारे कारणीभूत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच असून पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.

उष्णतेची लाट
उष्णतेची लाट
author img

By

Published : Mar 31, 2021, 6:46 PM IST

बुलडाणा - येत्या दोन दिवसात विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून स्वतःचे व पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भात अचानक तापमान वाढण्यामागे राजस्थानकडून येणारे उष्ण वारे कारणीभूत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच असून पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.

हेही वाचा - कामाच्या ठिकाणी महिला संरक्षणाच्या दिशेने एक पाऊल, टास्क फोर्स नेमणार

१ व २ एप्रिलपर्यंत कायम राहणार उष्णतेची लाट
हवामान विभागाने बुलडाणा जिल्हयात ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर ही लाट पुढील दोन दिवस म्हणजे १ व २ एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आज 31 मार्च रोजी ४२ ४२ डिग्री सेल्सियस तपमान-
आज 31 मार्च रोजी दुपारी 1 वाजता बुलडाण्यातील तापमान ४२ डिग्री सेल्सियस असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. शेतकरी बंधूंंनी उष्माघातापासून बचाव म्हणून शेतातील कामे शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी. जनावरांना सावलीमध्ये किंवा गोठ्यामध्ये बांधून ठेवावे, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - पुण्यातल्या धायरी औद्योगिक वसाहतीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.