बुलडाणा - परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार घातला. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आज राज्यपालांनी दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मदतीतवर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा- रिलायन्स कंपनीच्या संचालकपदावरून अनिल अंबानी स्वत: पायउतार
राज्यपालांनी नुकसान भरपाई म्हणून जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता त्यांना अजुन मदतीची अपेक्षा होती. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. तुटपंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शतकरी संघटनेने केला आहे.
मदत द्यायचीच असेल तर शेतकऱ्यांना कमीतकमी हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, तसेच अंगणवाडी ते पदवी पर्यंतचा शेतकऱ्यांच्या मुलांचा खर्च शासनाने उचलावा. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.