ETV Bharat / state

Travel Accident: पेठजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; ट्रॅव्हल्स नदीत कोसळून एका प्रवाशाचा मृत्यु तर 20 ते 25 गंभीर जखमी - पैनगंगा नदी

पेठजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स पुलावरून नदीत कोसळली आहे. या अपघातात एका वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत.

Travel Accident
ट्रॅव्हल्सचा अपघात
author img

By

Published : May 10, 2023, 10:09 AM IST

ट्रॅव्हल्सचा अपघात

बुलढाणा : शेगाववरून पुण्याकरिता जाण्यासाठी निघालेल्या स्वरा ट्रॅव्हल्स या खाजगी लक्झरी बसला चिखली रोडवरील पेठजवळ साधारणतः 11 वाजेच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी ही ट्रॅव्हल्स पेठ या गावाजवळील असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली. जवळपास 10 ते 15 फूट खोल कोसळलेल्या या बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहे. यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. जखमींवर खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सर्व प्रवाशांना मदत कार्य : जवळपास 25 ते 30 प्रवासी या खाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करत होते. त्यातील 3 प्रवासी गंभीर आहे. इतरांना मुका मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच पेठ येथील गावकऱ्यांनी व अमडापूर आणि चिखली पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचवून सर्व प्रवाशांना मदत कार्य केले. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

पूल अरूंद असल्यामुळे अपघात : पैनगंगा नदीवरील पूल हा खूपच अरुंद आहे. एका वेळी दोन मोठी वाहने पुलावरून जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या पुलावर कठळे सुद्धा नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात पूल कुठपर्यंत आहे, हे समजण्यात नवीन वाहन चालकांचा गोंधळ उडतो. रात्री झालेल्या अपघाताचे सुद्धा हेच कारण आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात जखमी झालेले प्रवाश्यांना मदतकार्य करण्यास रात्रीच्या अंधारामुळे अडथळे येत होते. हा अपघात झाल्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ही वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा : Nashik bus fire accident नाशिक बस आग दुर्घटनेत यवतमाळच्या १६ प्रवाशांचा समावेश, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक म्हणाले

हेही वाचा : Nagpur Travels Accident : पेंढरी घाटात ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली; ५ प्रवासी जखमी

हेही वाचा : Sangli Accident: सातारा-महाबळेश्वर राज्यमार्गावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात; चौघेजण जागीच ठार, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.