ETV Bharat / state

बंधाऱ्यात पोहायला गेलेले तीन तरुण वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध सुरू - बुलडाणा तरुण वाहून गेले बातमी

बुलडाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील बंधाऱ्यावर पोहोण्यासाठी गेलेले तीन युवक वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे.

विद्रुपा नदीवरील बंधारा
विद्रुपा नदीवरील बंधारा
author img

By

Published : Sep 14, 2020, 5:14 PM IST

Updated : Sep 14, 2020, 10:25 PM IST

बुलडाणा - सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तीन युवक वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. 14 सप्टें.) सकाळच्या दरम्यान घडली. तिघांपैकी गंगाराम शांतीराम भालेराव याचा मृतदेह सापडला असून अद्याप दोघे बेपत्ता आहेत. बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे.

बंधाऱ्यात पोहायला गेलेले तीन तरुण वाहून गेले
सिंदखेडराजा तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून बंधारे तुडुंब भरले आहेत. चांगेफळ येथील विद्रुपा नदीवरील बंधारा तुडुंब भरून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर 30 वर्षीय गंगाराम शांतीराम भालेराव, जालना जिल्ह्यातील 23 वर्षीय सुरेश बांगर व ज्ञानेश्वर भालेराव हे पोहण्यासाठी गेले होते.

दरम्यान, पोहत असताना गंगाराम शांतीराम भालेराव हा युवक वाहून जाताना त्याच्या घरी आलेला जालना जिल्ह्यातील पाहुणा सुरेश बांगर व ज्ञानेश्वर भालेराव हे त्याला वाचण्यासाठी गेले. मात्र, नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिघेही वाहून गेले. या तिघांपैकी गंगाराम शांतीराम भालेराव याचा मृतदेह सापडला असून अजूनही दोघे बेपत्ता आहेत. शोध कार्यासाठी बुलडाणा येथील बचाव पथक बोलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली असून गावकरीही मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहचून बेपत्ता तरुणांचा शोध घेतल्या जात आहे.

हेही वाचा - धक्कादायक: बुलडाण्यात 3 कोरोनाबाधित पोलिसांनी कारागृहात 10 दिवस बजावली सेवा

Last Updated : Sep 14, 2020, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.