ETV Bharat / state

भारत बंद: शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर; व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद - शेगावमध्ये तणाव

बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी भारत बंद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शेगावमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. रॅली दरम्यान दुकाने बंद करण्यावरून व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामुळे रॅलीत काही काळ गोंधळ उडून तणावाचे वातावरण तयार झाले होते.

शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर
शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर
author img

By

Published : Jan 29, 2020, 1:43 PM IST

बुलडाणा - नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी भारत बंद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शेगावमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोनादरम्यान आंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर

बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे दोन हजांरांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. हातात विविध झेंडे घेऊन उतरलेल्या हजारो आंदोलकांनी सीएए आणि एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा - नागपुरात नितीन विरुद्ध नितीन, रंगला शाब्दिक सामना

रॅली दरम्यान दुकाने बंद करण्यावरून व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामुळे रॅलीत काही काळ गोंधळ उडून तणावाचे वातावरण तयार झाले होते. मात्र. पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव दूर करण्यात आला. बहुजन क्रांती मोर्चाची रॅली चौकातून पुढे सरकताच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासाठी एक रॅली काढली. शेगाव शहरात शांतता असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी केले आहे.

Intro:Body:Mh_bul_Thousands of citizens on the streets_10047

Story : भारत बंद : शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर
बंदच्या विरोधात व्यापारीही रस्त्यावर

Anchor : सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व बहुसंख्य संस्था आणि विविध संघटनांच्या वतीने बुधवार २९ जानेवारी रोजी संपूर्ण भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात सकाळी ११ वाजता दोन हजाराच्या वर नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून एक राहिली काढण्यात आली या रैलीत २ हजराच्यावर नागरिकांचा सहभाग होता.रस्त्यावर उतरलेल्या हजारो नागरिकांनी सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात विविध झेंडे घेऊन उतरलेल्या नागरिकांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. भारत बंद आंदोलनात प्रामुख्याने तीन मागण्या आहेत. यामध्ये डीएनए आधारित एनआरसी करा, सीएए हटवा, ईव्हीएम बंद करा व देश वाचवा, या प्रमुख मागण्या आहेत.
काढण्यात आलेल्या रैलीमध्ये अनेक ठिकाणी व्यापाऱ्यान्सोबत दुकाने बंद करण्यावरून वाद झाले. यामुळे रैलीत काही काळ गोंधळ उडाला होता. शिवाजी चौक येथील काही व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करण्यास नकार दिल्याने या ठिकाणी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थींने हा तणाव वेळीच दूर करण्यात आला. मात्र ही रैली चौकातून पुढे सरकताच व्यापाऱ्यांनी ही दुकाने उघडण्यासाठी एक रैली काढली. शहरात वाढत्या नावाची स्थिती पाहता पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली. सध्या शहरात शांतता आहे.

. अफवांवर विश्वास ठेवू नये - ठाणेदार ताले

भारत बंदच्या आवाहनानंतर सर्वत्र शांतता आहे शेगाव शहरातही शांततेची परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्व समाजातील नागरिक आणि व्यापारी का कार्य करीत आहेत यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी. केले आहे

- फहीम देशमुख शेगाव (बुलडाणा)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.