बुलडाणा: कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. याबाबत मोठा गाजावाजा सुरू आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र, या सर्व प्रकारावर आशा सेविका काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र आशा सेविकांसाठी काम करणाऱ्या खामगाव येथिल सामाजिक कार्यकर्त्या तबसुम हुसैन यांनी हा प्रकार घृणास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे. किटमध्ये देण्यात येणाऱ्या रबरी लिंगला या किटमधून सरकारने काढावे. तसेच सेविकांना कुटुंब नियोजनाची माहिती देताना हे लिंग दाखवायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशामुळे सेविका काम करणे पसंद करणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा प्रकारच्या गोष्टी नाहीत. परंतु, राज्य सरकार रबरी लिंग देऊन माहिती देण्याचे सांगत आहे. विशेष म्हणजे, जेव्हा सेविका सांगतील तेव्हा घरी पुरुष ही राहू शकतात. त्यांच्यासमोर सांगणे हे आशा महिलांना लाज वाटणारी बाब आहे. आपण अमेरिका, इंग्लंड येथील संस्कृतीत राहत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने कुटुंब नियोजन किटमधील रबरी लिंग काढून टाकावे, अशी मागणी तबसुम यांनी केली आहे.