ETV Bharat / state

बुलडाण्यात 8 दिवसात तिसऱ्या फळीतील 5 हजार 988 जणांना कोविड लसीकरण

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावर लसीकरण केंद्र असल्याने आजारग्रस्त रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना व अपंगांना लसीकरण केंद्रापर्यत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने दुसऱ्या माळ्यावरील लसीकरण केंद्र तळ माळ्यावर घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Mar 10, 2021, 6:45 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात तिसऱ्या फेरीत 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना मंगळवारी 9 मार्चपर्यंत एकूण 8 दिवसात 5 हजार 988 जणांनी कोविडची लस घेतल्याची नोंद घेण्यात आली आहे. ज्यामध्ये 45 वर्षावरील 1 हजार 88 तर 60 वर्षावरील 4 हजार 900 असे एकूण 5 हजार 988 नागरिकांचा समावेश आहे. शिवाय बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावर लसीकरण केंद्र असल्याने आजारग्रस्त रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना व अपंगांना लसीकरण केंद्रापर्यत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने दुसऱ्या माळ्यावरील लसीकरण केंद्र तळ माळ्यावर घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

बुलडाणा

जिल्ह्यात 29 लसीकरण केंद्रावरून लसीकरण-

जिल्ह्यात सुरुवातीला पहिल्या व दुसऱ्या फळीतील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी कोविड लसीकरणाची शासकीय 13 आणि खासगी 6 केंद्रावरून 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या फळीतील 60 वर्षांवरील व 45 वर्षांवरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसीकरिता खासगी केंद्रामध्ये वाढ करण्यात आली असून 16 खासगी कोविड लस देण्यासाठी करण्यात आली आहे. असे एकूण 29 केंद्राद्वारे सध्या लसीकरण सुरू शासकीय केंद्रावर निःशुल्क आणि खासगी केंद्रावर 250 रुपये प्रत्येक लस प्रमाणे शुल्क ठरविण्यात आलेले आहे. बुलडाणा जिल्ह्यात तिसऱ्या फळीतील 60 वर्षांवरील व 45 वर्षांवरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोविड लसीकरणाची सुरुवात 2 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे.

दुसऱ्या माळ्यावरील लसीकरण केंद्रांचा वयस्कर, अपंगांना त्रास-

तिसऱ्या फळीतील 60 वर्षावरील व 45 वर्षावरील दुर्धर आजाराच्या नागरिकांकरिता लसीकरणाला 2 मार्चपासून सुरुवात झाली आहे. मात्र, बुलडाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या तिसऱ्या माळ्यावरील लसीकरण केंद्रांचा मोठा त्रास वयस्कर, आजाराने ग्रस्त व अपंगांना सहन करावा लागत आहे. अनेक वयस्करांना गुडघ्याचे आजार असल्याने, अपंगांना तिसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने अनेक लसीकरणापासून वंचित राहावयास पाहायला मिळत आहे. बुलडाणा शहरातील विष्णुवाडी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानच्या मागच्या बाजूला राहणारे दत्तात्रय देशमुख हे 51 वर्षाचे असून त्यांना उच्च रक्तदाब आणि साखरेचा त्रास आहे. साखरेमुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापतीमुळे जखम झाली आहे. यामुळे ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावर असलेलेल्या लसीकरण केंद्रापर्यंत पायी जावू शकत नाहीत. तर लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांना लस घेण्यापासून मुकावे लागत आहे. शिवाय त्यांचे वडील विनायकराव मोगुटराव देशमुख याचे वय 92 वर्षाचे आल्याने ते ही लस घेण्यासाठी दुसऱ्या माळ्यावरील केंद्रावर येवू शकत नाही. त्यामुळे तळ मजल्यावर लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी दत्तात्रय देशमुख यांनी प्रशासनाला केली आहे.

टीव्ही पत्रकार प्रवक्ता यांनी घेतली पत्रकारांतून पहिली लस-

तिसऱ्या फळीतील 60 वर्षांवरील व 45 वर्षांवरील दुर्धर आजाराच्या नागरिकांकरिता कोविड लस देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांमधून सर्वात आधी टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हा प्रवक्ता पत्रकार संदीप शुक्ला यांना कोविड लस घेण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांनी लस घेतल्यानंतर सर्व पत्रकारांना व नागरिकांना बिनधास्तपणे लस घेण्याचे आवाहन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.